मेहकर लोणार तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करा नसता तीव्र आंदोलन छेडू(Menkar)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Mehakar:मेहकर लोणार तालुक्यातील परतीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करा नसता आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उबाठा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरेंनी शासनास दिला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

उपविभागीय कार्यालय मेहकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व कृषिमंत्री यांना निवेदन देऊन गत 25 सप्टेंबर रोजी झालेल्या परतीच्या अतिवृष्टीने मेहकर व लोणार तालुक्याच्या सहा विभागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

त्या विभागातील पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अन्यथा शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदनाद्वारे देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Mehkar :याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या सह गजानन जाधव, लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, गजानन निकस, गजानन गीते, एकबाल कुरेशी, गोपाल वैद्य, शंकर कोकाटे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, कैलाश उबाळे, मंदाकिनी वैद्य, गोदावरी वैद्य, पंचफुला वैद्य, धुरपताबाई नरवाडे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Comment