प्रतिनिधी :- सचिन वाघे
mahsulnews:हिंगणघाट:- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील येळी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी (सेवा) वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो, तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे. वना, वर्धा नदीवर असलेले जवळ जवळ सर्व वाळू घाट या रेती डेपोला जोडले आहेत.
शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)
मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपो धारक नदीत अनधिकृत रित्या पोकलन्ड मशीन, यांत्रिकी बोट लाऊन टिप्पर च्या माध्यमातून नदीपात्रातून २४ तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सुर्व नियम पायदळी तुडवीत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि हि ग्रुप पणे विक्री केली जात आहे.
वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नाही. नियमानुसार रेती उपसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे. परंतु सायंकाळी सहा नंतर सुद्धा रेती उपसा चालू असतो. रेती साठा साठवून मोठ्या प्रमानात अनधिकृतरित्या विक्री सुरु आहे. त्यामुळे लाभ्यार्थ्यांना रेती मिळत नाही कारण त्यावर डेपो धारकाचे योग्य ते नियंत्रण नाही.
शेकापूर (बाई) च्या वाळू घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडो रुपयाचा महसूलाचे नुकसान होत आहे. 20 ते 25 टिप्पर आणि ट्रक्टर शेकापूर रेती घाटावर चोरी ची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. काही गाड्या जेसीपी च्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहे. याबाबत सबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही. अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचविण्याचे काम करीत आहे. आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी एक, दोन ट्रक्टर वाल्यांवर कारवाई करीत प्रशासन जागृत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे.
रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाही. कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध्य रेती माफियावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- (श.प) रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलन करेल. या आंदोलना नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
mahsulnews:यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश पाटील झोटिंग, शहर अध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक अशोक पराते, समाजसेवक सुनील डोंगरे, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, माजी नगरसेवक बालाजी बहलोद, विजय तामगाडगे, माजी जि.प. सदस्य घनश्यामजी येंडे, किशोर चांभारे, भोला निखाडे, मोहम्मद अली अजानी, नाना पुंड, रविभाऊ डेकाटे, उमेश नेवारे, संदीप चाफले, सौ. सरपंचां कविता वानखेडे, महिला कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, तालुकाध्यक्ष सुचिता सातपुते, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, राऊत मॅडम, जील्हाउपाध्यक्ष मीना सोनटक्के, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, मीनाक्षी ढाकणे, सरचिटनिस सविता गिरी ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील, सिद्धार्थ मस्के, शोहेब शेख, जितेंद्र रघाटाटे, अमित रंगारी, नितीन भूते, रमेश चतुर, रवी गिरसावले, सुनील घोडखांदे, तालीम कुमार पिसे, अमोल बोरकर, प्रवीण भूते, जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, अनिल भूते, गजानन महाकळकर, बच्चू कलोडे, सुशील घोडे, आकाश हूरले, दिनेश पिसे, कुणाल गोल्हर, हुकेश धोकपांडे, अमर धनविज, पंकज भट, सचिन घोडे, रवी बोरकर, राहुल बोरकर, नरेश चिरकुटे, दीपक चांगलं, वैभव बोरकर, मो. शाहिद, उपस्थित होते