बारा वर्षांपासून चाललेले क्रीडा संकुलाचे काम कधी होईल पुर्ण ?( lonarnews )

 

lonarnews:लोणार तालुक्यातील खेळाडू यांना तालुका क्रीडा संकुल व सोयी उपलब्ध करून देणे बाबत दिनांक 1 सप्टेबर 2024 ला लोणार येथील खेळाडू व लोणारकर’ टीम च्या वतीने मा. आमदार डॉ. संजयजी रायमुलकर आमदार मेहकर विधानसभा मतदारसंघ याना निवेदन देण्यात आले.

सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठे ही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी व खेळाडू क्रीडा संकुल वाचून व क्रीडा सोयीवाचून वंचित आहेत.
लोणार येथील क्रीडा संकुलाचे काम मागील दहा ते बारा वर्षापासून सुरू आहे.

लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

झालेले काम सुद्धा पडत आहे. काही लोक याचा गैरवापर घेत आहेत. काचा फोडून प्रवेश करत आहेत.
पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच भूषणावह नाही,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे या निवेदनात म्हटले आहे. तरी आमदार साहेबांनी क्रीडा संकुल लवकरच चालू करु त्यात लवकर लक्ष घालू व काम पूर्ण करू व सदर संकुल हे खेळाडूंना उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळी दिले आहे.

lonarnews:या प्रसंगी लोणार तालुक्यातील खेळाडू शाम आत्माराम कुटे, गणेश भास्कर उंबरकर, विजय मुंढे, कमलेश विनोद आगरकर, संदीप भोसले आणि ‘मी लोणारकर’ टीम सदस्य सचिन रामदास कापुरे इ. उपस्थीत होते.

Leave a Comment