लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

lonarnews:जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते शहरात देश-विदेशातील लोकांना या शहराचा आकर्षण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ते सरोवराचा सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अवस्थेची किडस यावी अशी परिस्थिती लोणार शहरात झालेली आहे.

लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षेतेमुळे लोणार शहराच्यां रसत्याचे तीन तेरा वाजलेले आहे. लोणार शहरात गटर नाल्याचे काम चालू आहे. ज्या ज्या परिसरात काम झाले त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारची रोडची दबाई करून खड्डे भरले नाही शहरामध्ये रस्त्यावर चालताना अनेक घटना घडत आहे.

रोड झाले खड्डेमय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्या रोडवर खड्डेच खड्डे झालेले आहे. याकडे लोणार नगरपालिका प्रशासनाचा दुर्लक्ष आहे. लोणार वासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यापासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.या रस्त्यावरुन गणपती बप्पाचे अगमण होणार आहे.

पंरतु अघाप पर्यत तही नगरपालिकेकडुन कोणतीही पाहणी करण्यात आली नाही तसेच लोणार विविध परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याकडे नगरपालिकेचे प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

lonarnews:या घाणीमुळे लोणार शहरात रुग्णांची संख्या वाढ यामध्ये लहान मुलाचा प्रमाण जास्त प्रमाणात आहे लोणार शहरात साथीचे रोग डोके वरी काढत आहे याकडे मुख्य अधिकारी याकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनतेकडून होत आहे व अर्धवट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का असा जनतेकडून बोलल्या जात आहे.

महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलिंची विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड.(Hingnghat )

प्रतिक्रिया
! मुख्याधिकारी यानी लोणार शहरातील संपुर्ण प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते तात्काळ संपूर्ण शहरातील वार्डीची स्वत:हा लक्ष देवुन सफाई करून घेण्यात यावी जनेकरुन जनतेच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही यांची काळजी घ्यावी शहरामध्ये सदृर्श डेंगु,वायराल सारखे आजारामुळे अनेक रुग्णांचा संख्यामध्ये वाढ दिसुन येत आहे त्यामध्ये लहन मुलांचा मोठा प्रमाणात दिसुन येत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच शहरामधील गटार नाळयाच्या खोद कामामुळे शहरातील रस्ते मध्ये गड्ढेच गड्ढे झाले आहे यांची दखल त्वरीत घ्यावी व याची जबाबदारी प्रशासना वर राहिल. *शेख समद शेख अहमद लोणार शहर काँग्रेस अध्यक्ष
प्रतिक्रिया
माळीपुरा परिसरात एअरटेल कंपनीच्या केलेल्या खोद कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे वारंवार तक्रार करूनही मुख्याधिकारी व बांधकाम विभागाला माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही उद्यापासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन त्या रस्त्यावरून होत असल्यामुळे जर त्यांची विटंबना झाली तर नगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहील खोट काम परवानगी दिली असेल तर पूर्वत काम करून का घेतले नाही खोदकाम व केबल टाकल्यानंतर नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे येऊन सुद्धा पाहिला नाही गजानन जाधव सर शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

Leave a Comment