प्रतिनिधि सय्यद जहीर
शहरात सीसीटीव्ही कॅमेर्यांची नितांत आवश्यकता असल्याचे काही महिन्यात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. अनेक मोठमोठ्या घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरयांचा अभाव असल्याने पुरावे नसल्याची माहिती समोर येत आहे.
लोणार हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. पंरतु हे अनेक मुलभूत सोयी सुविधा पासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. लोणार शहरात देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने कोणतीही उपाययोजना पहावयास मिळत नाही.
लोणार शहरात वाढत्या चोऱ्या, वाढते पशुधन चोरी, अपघात, मनुष्य हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त होत आहेत. पंरतु लोणार शहरात असलेला सीसीटीव्ही कॅमेराचा अभावामुळे हया अनेक गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात दिरंगाई होत असून तपासात अपयश येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोणार शहराचा सुरक्षेचा प्रश्न असून जनमाणसात “असंतोष” निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)
लोणार शहरात अनेक शाळकरी मुली हया लोणार ला बाहेर गावावरून शिकण्यासाठी येत असतात. त्यांना सुद्धा चीडीमारीचा बसस्थानक परिसर मुख्य चौकात सामना करावा लागत आहे तसेच लहान मुल शाळेतून येत असतांना दुचाकीस्वार हे तुला घ्यायला तुझ्या घरच्यांनी आम्हाला पाठवल आहे.
असे सांगून अपहरण करण्याच्या बेतात असल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. तरी या सर्व घटनेंचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने पर्यटक, विद्यार्थीनी, लहान शाळकरी मुले-मुली यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.
लोणार बसस्थानक परिसरात व लोणार शहरातील मुख्य ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास घटनांचा तपास करण्यास तपासयंत्रणाना सोयीचे होईल. गुन्हा घडण्यावर ही आळा बसू शकतो.
भूषण मापारी पाटील, मा.नगराध्यक्ष,न.प. लोणार.
मेहकर येथे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सोहेल शर्मा हे कार्यरत असतांना त्यांनी लोणार शहरात सीसीटीव्ही कॅमेरयांचा डेमो घेतला होता.
त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नागरिक व पर्यटक यांच्या सुरक्षेची चिंता प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. किमान आतातरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.
गजानन मोरे, सामाजिक कार्यकर्ते, लोणार.
लोणार शहरे ऐतिहासिक शहर आहे या शहरांमध्ये इतिहासा साठी इतिहासकार , सहली तसेच देश विदेशातून पर्यटक येत.
आहे परंतु या शहरांमध्ये प्रशासन कोणत्याही प्रकारचे गांभीर घेत नसून लोणारच्या चारी बाजूने अशी वैभवशाली स्वागत गेट उभारण्याचे व शहरांमध्ये विविध ठिकाणी कॅमेरे लावण्याची गरज आहे जेणेकरून शहरात येणारे जाणारे व्हानावर आणि चुकी ने घडणारी घटणा सुद्धा लक्ष देता येईल.
Lonarnews :तसेच लोणार शहरांमध्ये चालू असलेले अवैध धंदे ज्या च्यावर कुठेतरी आळा बसेल त्या मुळे प्रशासनाने तातडीनेया यावर्ती कार्य करावे मा.नगर सेवक तथा मा.संजय गाधी निराधार योजना तालुका अध्यक्ष शेख करामत शेख गुलाब