प्रतिनिधि सय्यद जहीर
lonarnews:दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रस्तावनेची एका माथेफिरू इसमाने फाडतोड करून विटंबना केल्यामुळे परभणी येथील आंबेडकर वाद्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले त्यामुळे परभणी येथील पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून त्या ठिकाणी होत.
असलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला संचारबंदी लागू करून बौद्ध वस्तीमध्ये कोंबींग ऑपरेशन केले आणि अनेक कार्यकर्त्यांनवर लाठी चार्ज करून महिला पुरुषांना सुद्धा बेदम मारहाण केली अनेक ठिकाणी वाहनांची सुद्धा तोडफोड केली.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
त्याच आंदोलनामध्ये सोमनाथ चव्हाण या युवकाला बेदम मारहाण करून पोलिसांनी पोलीस कोठडी मध्ये ठेवून मारहानकेलयामुळे सोमनाथ चव्हाण यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे.
ज्या संविधानावर अख्खा देश चालतो आणि आम्ही त्याचा आदर सन्मान करतो अशा संविधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंठकावर आणि ज्यांच्या खांद्यावर देशाच्या संरक्षणाची तसेच कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्याची जबाबदारी सरकारने दिलेली आहे.
अशा पोलीस प्रशासनाकडून कायद्याचा अभ्यास करीत असलेल्या एलएलबी च्या तिसऱ्या वर्षांमध्ये असलेल्या सोमनाथ चव्हाण या युवकाला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी व संबंधितशासकीय अधिकारी दोषी असलेल्या वर कठोर कारवाई करून निष्पक्ष तपासणी करून दोषी असलेल्यांना न्यायालयीन कक्षेत आणावे संविधानाच्या आदर्शाच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी या घटनेमुळे आंबेडकरी प्रेमी लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्यासाठी त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
lonarnews:भारतीय संविधान प्रस्तावनेची विटंबना आणि सोमनाथ चव्हाण यांची पोलीस कोठडी मध्ये हत्या केल्यामुळे या घटनेचा सुलतानपूर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आलेला आहे अशा आशयाचे निवेदन लोणार तहसीलदार भूषण पाटील यांना सादर केलेले आहे या निवेदनावर भाई सुरेश मोरे शेख निसारभाई संतोष पाटील शेख वसीम भाई विनोद अंभोरे स्वप्निल अवचार राजेश अवचार अमोल अवचारआशा अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत