लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर
lonarnews:शालेयदशे पासुन शिक्षणा सोबतच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सागर पनाड यांच्या विविध समाज प्रबोधनाच्या उपक्रमां सोबतच सामाजिककार्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय समाज भुषन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
क्रेडिट ,डेबिट कार्ड, UPI payment वर खरच 18% GST लागणार का ?..(GST )
पहाट फाऊंडेशेन छत्रपती संभाजीनगर च्या वतीने राज्यभरातून विविध प्रकारे सामाजीक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समितीच्या वतीने ह्या पुरस्काराची घोषणा करण्यात येते.
दि. 14 स्प्टेंबर ला नांदापुरकर सभागृह ,मराठवाडा साहित्य परिषद छ. संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत ह्या पुरस्काराने सागर पनाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी शासनाचा वन भुषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ सा. कार्यकर्ते चैत्राम पवार ,जे.जे हॉस्पीटलचे डॉ. जीवन राजपुत , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारूती म्हस्के यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार असुन प्रसिद्ध कवि दंगलकार नितीन चंदनशिवे , डॉ.बा.आ. विदयापिठाचे प्राचार्य डॉ.पी.एम.शहापुरकर ,प्रा. रमेश गावीत , दिलीप शिखरे व पहाट फांउडेशन च्या अर्पिता सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती असणा असल्याचे संयोजक अमोल भिलंगे यांनी निमंत्रण पत्रव्दारे कळविले आहे .
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सागर पनाड हे सामाजीककार्या सोबतच पत्रकारीता क्षेत्रात मागील २० वर्षापासून कार्यरत असुन अन्याय अत्याचार , भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या लेखनीला नेहमीच तिव्र धार असते तर समाजिक सलोखा वृध्दीगत व्हावा , दिनदुबळ्यांची सेवा घडावी , गरजवंताच्या उपयोगी येण्याच्या वृत्तीने ते सर्वदुरपरिचीत आहेत .
lonarnews:सिध्दहस्त पत्रकारीते मुळे शासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यां सोबत असलेल्या त्यांच्या सबंधाचा उपयोग ते नेहमी चांगल्या व समाजउपयोगी कामांसाठी करतात या मुळे अनेक समस्यां मार्गी लावत समाजउन्नती च्या कार्यां साठी सागर पनाड यांचे प्रत्येक्ष अपत्येक्ष योगदान असतेच तर सर्व धर्मीय बांधवांच्या सण उत्साहात त्यांची प्रामुख्याने उपस्थिती असते अशा अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेल्या सागर पनाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्करासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.