पाणीपुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा डॉ. गोपाल बछिरे (Lonarnews)

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:मेहकर पाणीपुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन जल जीवन मिशन कामाची माहिती द्या नसतात आंदोलनाचा इशारा शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी दिला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाविषयीची माहिती मागण्यासाठी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्याकडे सहा तारखेला निवेदन देण्यास गेले असतात तेव्हाही ते उपस्थित नव्हते व आज सुद्धा ते कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता

अर्ध्या तासात कार्यालयात पोहोचतो असे सांगितले दीड तास वाट पाहून सुद्धा धाबे साहेब कार्यालयात फिरकले नाही म्हणून माहिती मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमानभाई कुरेशी, युवा शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, किसन आघव, गणेश पाठे यांनी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्या खुर्चीला निवेदन निवेदन देऊन खालील माहिती मागितली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

१) जलजीवन मिशनच्या कामे पूर्ण करण्याचाअवधी काय होता व वेळेत कामे पूर्ण न होण्याची कारणे
२) लोणार मेहकर तालुक्यात जलजीवन मिशन चे काम किती प्रतिशत पूर्ण झाली व किती बाकी आहे याविषयीची सविस्तर माहिती देने.

३) सुरुवातीपासून जलजीवन मिशनचे काम कोण कोणत्या व्यक्तीस किती किती रकमेची दिली त्याविषयी सविस्तर माहिती देणे.
४) सुरुवातीपासून जलजीवन मिशनचे काम कोणत्या फर्म ला किती किती दिले त्याचे बजेट किती त्याविषयी सविस्तर माहिती देणे.

Lonarnews :उपरोक्त माहिती तत्काळ देण्यात यावी अन्यथा पाणीपुरवठा विभागाच्या विरुद्धार्थी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला.

Leave a Comment