विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी(Lonarnews)

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

Lonarnews :लोणार तालुक्यातील खापरखेड घुले या ठिकाणी कित्येक वर्षापासून विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा असलेल्या जागेवर गावातील एका व्यक्तीने आपल्या शौचालयाचे आउटलेट काढून पाणी काढलेले आहे.

सदर जागेवर काही झाडे लावून केरकचरा लाकूड फाटे टाकून अतिक्रमण करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे असे एका निवेदनाद्वारे सुनील गोपाळ मस्के राहणार खापरखेड घुले यांनी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केलेली आहे.

गटविकास अधिकारी लोणार तहसीलदार लोणार आणि ग्रामपंचायत खापरखेड घुले यांना सुद्धा अशी तक्रार केलेली आहे परंतु स्थानिक सरपंच ग्रामसेवक याविषयी अनास्था दाखवत असल्यामुळे दिनांक 2. 9.2024 वार सोमवार पासून झेंड्याच्या जागेवर खापरखेड घुले येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

हिंगणघाट येथील माजी नगरसेवक बाबाराव दादाजी ठाकरे यांचे सह अनेक पुरुषांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश(Bjpnews)

निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे परंतु स्थानिक सरपंच सचिव पाच पंच यांनी केलेल्या स्थळ निरीक्षणा नुसार सदरहू जागा ही(गाव नमुना 8 सह) भीमराव दगडू पंडागळे यांच्या व पंचफुला भीमराव पंडागळे यांच्या नावाने असल्याचे दिसून आले आहे.

सदरहू जागेत लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा हा मालकीच्या जागेत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याच्या गाव नमुना आठ नुसार मालकीची असल्यामुळे आमच्याकडे सदर जागेचे सर्व कागदपत्र पुरावे आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

असा दावा करून सदरहू तक्रारदाराने सभा मंडपाची सुद्धा मागणी केली परंतु गाव नमुना आठ नुसार दाखविलेल्या जागेच्या चतुर सीमा नसल्यामुळे वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवता येत नाही असे ग्रामपंचायत सचिवांचे म्हणणे आहे.

वृत्त प्रतिनिधी यांनी दोन्ही बाजू तपासल्या असता मोठा पेच प्रसंग या ठिकाणी दिसून येत आहे यातून शासकीय अधिकारी आणि गावकरी कसा उपोषणकर्त्यांना न्याय देतात ही देखील तारेवरची कसरत आहे

Lonarnews :वंचित बहुजन आघाडीचे नेते भाई नागवंशी संगपाल पनाड यांनी उपोषण मंडपास भेट देऊन चर्चा केली बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

Leave a Comment