जनतेच्या मनातील रस्त्यावरचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला माणूस, आंदोलन सम्राट नागवंशी संगपाल पनाड उतरणार लोणार ,मेहकर विधानसभेच्या रिंगणात(lonar)

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :नागवंशी संघपाल पनाड यांची सुरुवात 2006 भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत सुरुवात झाली.

कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आपलं आगळे वेगळे स्थान निर्माण केले.2006 पासून सक्रिय समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली शेकडो आंदोलने मोर्चे काढत, हजारो गोरगरीब, पिडीत, वंचित ,शोषित, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, जनतेला न्याय देण्याचे काम आजपर्यंत करत आहेत. 2019 च्या लोणार नगरपालिका निवडणूकीमध्ये त्यांच्या नेतृत्वात त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह दोन नगरसेवकाचे उमेदवार उभे केले.

त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाचे रात्र करून चाणक्य नीती वापरून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेत अवघ्या 400 मताने पराभूत झाला. स्थानिक आमदार खासदार यांच्या उमेदवाराला शह देत शिवसेनेचा उमेदवार तीन नंबर वर ठेवला,सुलतानपूर हे गाव लोणार तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून मुंबई नागपूर हायवे वरती वसलेले गाव आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

स्वातंत्र्यापासून ते 2019 पर्यंत मागासवर्गीय स्मशानभूमी मध्ये प्रेत यात्रा नेण्यासाठी रस्ता नव्हता या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक निवेदने मोर्चे उपोषण केले परंतु, निगरगठ्ठ प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही मार्ग निघला नाही. ही बाब नागवंशी संघपाल पनाड यांच्या जिव्हारी लागली.

त्यांनी हा विषय हातामध्ये घेऊन 2019 मध्ये त्यांचे वडील कचरू राघो पनाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांचा अंतिम संस्कार अग्नीडाव सुलतानपूर ग्रामपंचायत कार्यासमोर केला. त्यामुळे प्रशासनाला जाग आली त्याची दखल घेऊन .त्यानंतर त्या ठिकाणी अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांची सिमेंट रस्ता स्मशानभूमीचे काम करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांची गाजलेले आतापर्यंत आंदोलने शेतकऱ्यासंदर्भात महावितरण कारल्यासमोर आमरण उपोषण, शेतकऱ्यासंदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेने कर्जमाफी संदर्भात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आंदोलन, 2021-22 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी मुंबई-नागपूर हायवेवर्ती रस्ता रोको आंदोलन, पाणी प्रश्नासाठी शोले स्टाईल आंदोलन, घरकुलधारकाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण, अनेक रस्ते नाल्या विकास कामाच्या संदर्भात शेकडो आंदोलन करून, त्यांनी जिल्हाभर आंदोलन सम्राट म्हणून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली.

2006 पासून ते आजपर्यंत त्यांच्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वस्व मानून रेखाताई ठाकूर, अशोकभाऊ सोनोने,प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, साहेबराव तायडे,सविता ताई मुंडे, भिमराव‌ तायडे,निलेश भाऊ जाधव, प्रशांत भाऊ वाघोदे, विष्णू भाऊ उबाळे , प्रा.डॉ.के.बी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. 2017 मध्ये तालुकाध्यक्ष असताना जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक लागली त्यामध्ये दोन जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार व चार पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार रिंगणात उतरून त्यामध्ये सुलतानपूर सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार हा माळी समाजाचा देऊन त्यामध्ये अटितटीच्या लढतीमध्ये 2200 मतदान घेऊन तीन नंबर वर राहिला.

व पंचायत समिती सदस्य पदाचा उमेदवार मुस्लिम समाजाचा देऊन अवघ्या 200 मताने पराभूत होत दोन‌नंबर राहिला.2017 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुलतानपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून त्यामध्ये पॅनल उभे करून स्वतः सरपंच पदाचा उमेदवार म्हणून दोन नंबर वर राहिले अल्पशा मताने पराभूत झाले. त्यांच्यासह पाच सदस्य निवडून आणले. त्यानंतर 2022 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वता सह आठ सदस्य निवडून आणले. त्यानचा मतदार संघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्या पासून ते तळागाळातील माणसासोबत दांडगा जनसंपर्क आहे.

Lonar :जनतेने एक आपला आपल्या मधील आपला हक्काचा माणूस आपले दुःखदर्द जाणणारा तळागाळातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, विधानसभेमध्ये पाठवले तर नक्कीच मतदार संघामध्ये सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर,शोषित, पीडित, वंचित, अपंग, निराधार, विधवा, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन मतदारसंघ विकासाच्या उंबरठ्यावर नेतील.

Leave a Comment