सय्यद जहीर लोणार /बुलढाणा
Lonar :लोणार बायपास हा 2008 पासून मंजूर असुन आजपर्यंत प्रलंबीत आहे. निधी अभावी तो तरसाच पडून आहे. लोणार मधुन जाणारा रोड हा बस स्टॅन्डच्या समोरून जात असुन लोणार तालुक्याला लागून जालना, परभणी, वाशिम अशा सिमा असून पुर्णा नदी लोणारच्या अगदी जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात रेती (वाळू) वाहतुक होत असते.
तसेच लोणार गावातून जाणारा रस्ता हा अरुंद असुन दोन वाहनही जाऊ शकत नाहीत त्याच रस्त्याने लोकांना जीव मुठीत धरून रस्त्याच्या कडेने चालावे लागते मोठ्या प्रमाणात जड़ वाहणे लोणार मधुन जातात तेंव्हा अनेक वेळा जिवीतहानी झालेली आहे.
या आगोदर ही दि.28.8.2024 रोजी निवेदन दिलेले होते परंतु यावर काहीही ठोस पावले उचलले गेले नाही.लोणारची जनता वाहतुकीच्या समस्येने त्रस्त आहे. लोणारचा रस्ता हा कोंडवाडा झाला असून लोणार बायपास हा सर्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असून निधी नाही असे वारंवार सांगतात
लोणार सरोवराच्या भौताली लोणार सरोवर विकास आराखड्या अंतर्गत अभयारण्यातील पशुप्राणी वाचविण्यासाठी 70 कोटीचा निधी प्राप्त झाला असून काम चालु आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यारस्त्याचा मणुष्यासाठी काहीही उपयोग नाही. शासन प्राण्यासाठी 70 कोटी निधी देतो परंतु माणसा साठी निधी नाही. असे सांगतात म्हणजे माणसाची किमंत शुन्य आहे.
Lonar :या सरवांचा विचार करुन वरिष्ठाकडे बायपास 2008 पासून मंजूर झाला असून त्याचे काम चालू करावे असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते संघपाल पनाड, लोणार शहर अध्यक्ष दिपक अंभोरे व तालुक्यातील पद अधीकारी यांनी लोणार तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.