प्रतिनिधि सैय्यद जहीर
lonar:परभणी येथील संविधानाच्या अवमान बद्दल दोषीवर कठोर शासन होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गुढ मृत्यूची एसआयटी चौकशी करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या वतीने राज्यपालांना देण्यात आला
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
१० डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे अवमान करण्यात आले त्याबद्दल दोशींवर कडक कार्यवाही व्हावी याकरिता आंदोलक सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी यांनी आंदोलन केले त्या आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडीत असताना दिनांक १५ डिसेंबर रोजी कोठडीतच त्याचा गुढ मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू की हत्या हे तपासण्यासाठी महामहीम राजपाल यांनी एसआयटी समितीचे गठन करून तपास करण्यात यावा व दोषींवर कठोर कार्यवाही करावी.
अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मा. तहसीलदार लोणार यांच्यामार्फत महामहीन राज्यपालांना देण्यात आला.
lonar:याप्रसंगी जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, यांच्यासह तालुका संघटक कैलाश अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे शहर प्रमुख इकबाल कुरेशी, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ, तालुकाप्रमुख तारामती जायभाये, शहर प्रमुख पार्वतीताई सुटे, नगरसेविका सिंधुताई जाधव, सौ रंजना बछीरे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, समरजीत बछीरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे आदी उपस्थित होते