लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त खळेगाव येथे स्मारकाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार देवानंद सानप यांच्या हस्ते झाले उद्घाटन(Lonar)

0
1

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonar:लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला लोणार तालुक्यातील खळेगाव येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या नियोजित स्मारकाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार देवानंद सानप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये अनिल नागरे अकोला पोलीस निवड, मंगेश नागरे धाराशिव येथे तलाठी , सतीश नागरे नागपूर पोलीस , श्रीकांत नागरे न्यायालय लिपिक अमरावती ,मनीषा सरदार न्यायालय लिपिक परभणी, कल्याणी नागरे डी फार्म मध्ये उच्च श्रेणी प्राप्त, प्रवीण वायाळ एमबीबीएस साठी निवड,

प्रतीक सानप आयआयटी मार्फत बेंगळूर येथे नामांकित कंपनीत निवड, राधेश्याम नागरे तलाठी रायगड, गणेश नागरे संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी पदी निवड, ओम प्रकाश सरोदे एमबीबीएस साठी निवड तसेच इतरही गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे शाखा व्यवस्थापक स्वप्निलजी तायडे, क्षीरसागर ग्रामसेवक, गणेश सानप मुख्याध्यापक, शेजुळसर मुख्याध्यापक, मापारी सर मुख्याध्यापक, अशोक मुंडे पत्रकार तथा गावातील शेकडो नागरीक उपस्थित होते.

Lonar:या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेता प्रतिष्ठान खळेगाव तसेच समस्त गावकरी मंडळी खळेगाव यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here