डॉ. गोपाल बछिरे यंनी मेहकर लोणार विधानसभा अपक्ष लढण्यास माघार का ?(lonar)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonar:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी मेहकर लोणार विधानसभा अपक्ष लढण्यात माघार का घेतली.

शिवसेना फूटी नंतर मेहकर विधानसभा मतदारसंघ चे आमदार व बुलढाण्याचे खासदार हे शिंदे गटात गेले त्यांच्याबरोबर संपूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे सदस्य व पदाधिकारी हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले,

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यात शिल्लक राहिले त्यापैकी प्रा. नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत, नंदकुमार कराडे, आशिष रहाटे, लिंबाजी पांडव, किशोर गारोळे, गजानन जाधव, एड दीपक मापारी लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, इकबाल कुरेशी यांच्यासारखे निष्ठावंत उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहिले या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात संघटन पुनर्बांधणीचे काम डॉ. बछिरे यांनी जोमाने सुरू केले.

विद्यापीठ प्राध्यापकाच्या नोकरीची स्वेच्छा निवृत्ती घेऊन पूर्णवेळ संघटन बांधणीत व सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे उपोषणे करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यात

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घातला पाच वर्षापासून पुरातत्त्व विभागाने स्नानासाठी बंदी घातलेली धारतीर्थ आंदोलन करून सुरू केले परंतु याचे श्रेय डॉ. बछीरे यांना मिळू नये म्हणून ते पुन्हा बंद पाडले अशा अनेक आंदोलने करून व पक्ष संघटन बांधणीतून डॉ. बछिरे यांची मतदार संघातील शेवटच्या माणसापर्यंत, शिवसेना म्हणजे गोपाल बछिरे व मशाल म्हणजे गोपाल बछिरे  ही ओळख निर्माण झाली. मेहकर विधानसभेचे शिवसेनेचे तिकीट गोपाल बछीरे यांनाच मिळणार व तेच निवडून येणार हा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला होता, परंतु काही चक्रे फिरली आणि सदरील विधानसभेचे तिकीट सिद्धार्थ खरात यांना मिळाले यावर मतदारसंघातील सामाजिक नेते, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी डॉ. बछिरे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह धरला

lonar:आणि बछीरे यांनी  भरलाही व अपक्ष राहून निवडून येणार हा विश्वासही निर्माण झाला होता परंतु  डॉ. बछीरे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेनेचे सचिव व नेते विनायक राऊत, अनिल देसाई, भास्करराव जाधव, यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही शेवटी चार नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता उद्धव साहेबांचा फोन आला व त्यांनी डॉ. बछीरे यांच्या कामाचे कौतुक करून भविष्यात आपणास न्याय दिला जाईल असे आपण अर्ज मागे घ्यावा असे सूचित केले, मातोश्रीला पंढरी व उद्धव साहेबांना पांडुरंग मानणारा गोपाल बछिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व संपूर्ण ताकतीने सिद्धार्थ खरात यांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment