प्रतिनिधि सैय्यद जहीर
Lonar :मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनामध्ये सांगताना सांगितले संवाद यात्रा का निघत आहे ?
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे. कारण आपण 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024 च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे. ज्या बुद्धिजीवी लोकांनी सविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या 2024 विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे. असे सांगितले व अशोक भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष साबळे ता,ई साबळे सर, मेहकर ता.अध्यक्ष मोरे सर, लोणार ता. अध्यक्ष राहुल अंभोरे सर, युवा नेते अनित्य घेवंदे,बळीभाऊ
Lonar :मोरे,मोबिन भाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दिपक अंभोरे,आबाराव वाघ, भुजंग शिरसाट , जितु भाऊ डोंगरदिवे, सिद्धार्थ अवसरमोल , प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे ,शेख ताई, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजहंस जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार , गवई सर,गौतम गवई ,यांनी परिश्रम घेतले.