लोणार तालुक्यातील नऊ केंद्रा मधुन किनगाव जटुटु केंद्र प्रथम(lonar)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :महावाचन मध्ये मुलांनी पुस्तके वाचन करायची व त्या आधारे सारांश लेखन करायचं आणि सारांश लेखनाचे फोटो ऑनलाईन अपलोड करायचे होते.किनगाव जटुटु केंद्रा तील वर्ग तीसरी ते बारावी 1179 विद्यार्थी होते.

त्यापैकी 1179 विद्यार्थ्यांचे सारांश लेखनाचे फोटो महावाचन चळवळी अंतर्गत लोणार तालुक्यातील सर्व केंद्रातील सर्व शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो महावाचन साईटवर अपलोड करून दिलेल्या वेळेच्या आधी किनगाव जट्टू केंद्राने शंभर टक्के काम पूर्ण करून घेतले.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

त्यामध्ये सर्व शाळेचे मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी अतोनात मेहनत घेतली व आपलं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करून तालुक्यातील नऊ केंद्रा मधून किनगाव जट्टू केंद्र हे प्रथम क्रमांकावर आले.

केंद्रप्रमुख या नात्याने सर्व मुख्याध्यापकाकडून व सर्व शिक्षकाकडून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मनापासून शंभर टक्के प्रयत्न केले तालुक्याच्या या प्रामाणिक प्रयत्न मध्ये किनगाव जट्टू केंद्र हे सुरुवातीला पहिल्या क्रमांकावर असणारे केंद्र काही तांत्रिक अडचणीमुळे पाचव्या क्रमांकावर आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी व केंद्रप्रमुख यांनी थोडी मेहनत घेतली व किनगाव जट्टू केंद्र निर्धारित वेळेच्या आधी शंभर टक्के पूर्ण करून घेतल्याबद्दल माननीय गटशिक्षणाधिकारी लोणार जंगलसिंग राठोड साहेब व विस्ताराधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक कुंभारे साहेब विस्ताराधिकारी गुलाब राठोड साहेब व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख तसेच तालुकास्तरावरून महा वाचन चे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुमराळा येथे महावाचन उपक्रमित सहभागी विधार्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Lonar:किनगाव जटुटु केंद्रोचे केंद्रप्रमुख गजानन कायंदे सर यांनी महावाचनचे कार्य निर्धारित वेळेच्या आधी पुर्ण केल्याबद्दल त्यांचे तालुका स्तरावरून अभिनंदन करण्यात आले.केंद्रप्रमुख गजानन कायंदे यांनी त्यांच्या अभिनंदनचे श्रेय किनगाव जटुटु केंद्रातील मुख्याध्यापकांना दिले आहे.

Leave a Comment