घरकुल मंजूर होऊन ही वेळेत अनुदान मिळेना(lonar)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :गरीब, दुर्बल कच्च्या घरात राहणार्या आणि बेघर नागरीकांना अशा सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरन आहे.2024 परेंत सर्वाना हक्काचे घर मिळावे त्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे.

अनुसूचित जाति व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थांना लाभ देण्यासाठी राज्याशासना कडुन रमाई आवास योजना तसेच विमुक्त जाति व भट भटक्या जमाती साठी विविध योजना आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

पण इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता अश्या प्रकारच्या कोणत्याही योजना नव्हत्या म्हणुन राज्य सरकारने महाराष्ट्र मोदी आवास घर कुल योजना राबवले परंतु किनगाव जटुटु परिसरातील योंजनेतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम पुर्ण होऊनही लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किनगाव जटुटु येथील लाभार्थ्यांना पहीला हप्ता 15000/- हजार मिळाले असुन त्यांनी अपल्या घराचे काम पुर्णकरण्या साठी ऊधार ऊसने करुन घराचे काम पुर्ण केले त्यांना उर्वरित हप्त्याची प्रतिक्षा आहे.

Lonar:लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देण्याची मागणी गटविका अधिकारी पंचायत समिति लोणार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे दि.26.9.2024 रोजी किनगाव जटुटु येथील बेबी पांडुरंग राऊत, रेणुका गणेश जगताप,मंदा शिवाजी जाधव,दारका बाई गबाजी राऊत यानी केली आहे.

Leave a Comment