रात्रीच्या इमर्जन्सी भारनियमनाने लोणार शहरवासी त्रस्त.(lonar )

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :इमर्जन्सी भारनियमनाच्या नावाखाली रात्री अपरात्री वेळाेवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. लोणार शहरासह ग्रामीण भागात विद्युत विभागाकडून रात्रीच्या वेळी तब्बल दोन ते तीन तास रात्री वीज बंद ठेवली जाते. या सततच्या इमर्जन्सी भारनियमना मुळे लोणार शहरवासी त्रस्त झाले आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

हे इमर्जन्सीच्या भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी विद्युत वितरण विभागाकडे केली आहे.

पावसाळ्याचे दिवस सुरू असताना एकीकडे सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे . त्यामुळे मच्छरांचा त्रास वाढ आहे . त्यामुळे डेंगुचे रुग्ण वाढतांना दिसत आहे . वीज गुल झाल्याने रात्रीच्या वेळी घरात नागरिक त्रस्त झाले.

आहे.दिवसभर काम करून थकलेला शेतकरी, शेतमजूर रात्री निवांत झोप मिळेल, या आशेवर असताना वीज गुल होते. लहान बालके, आजारी व्यक्ती तसेच वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोणार शहर हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्याने ‘ अ ‘ वर्ग पर्यटन स्थळ असुन या ठिकाणी मागील काळात विद्युत विभागाकडून भारनियमन बंद करण्यात आले होते .परंतु विद्युत विभागाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन स्थळ या ठिकाणी सुद्धा इमर्जन्सी भारनियमना मुळे पर्यटक व शहरवासी त्रस्त झाले आहे .

हे इमर्जन्सी चे भारनियमन तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये भारनियमन सतत सुरू असताना शासनाने जे पर्यटन स्थळे आहेत ते या भारनियमनामधून वगळण्यात आले होते .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यामध्ये लोणार हे ‘अ’ वर्ग दर्जा पर्यटन स्थळ , विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे गजानन महाराजांचे शेगाव , आणि मातृतीर्थ म्हणून ज्याला नावलौकिक मिळालेला आहे . असे सिंदखेडराजा यांना भारनियमानामधून वगळण्यात आले होते . नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीच कल्पना नाही असे ते सांगतात .

Lonar :तरी शासन स्तरावर याची दखल घेण्यात यावी आणि पर्यटन स्थळ असलेले सर्व स्थळे हे भारनियमनामधून वगळण्यात यावी. आणि लोणार वर होणारा भार नियमनाचा सततचा अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे.
लोणार विभागामध्ये जी पद रिक्त आहेत ती तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी सुद्धा होत आहे.

Leave a Comment