loksabha:मलकापूर: रावेर लोकसभा मतदारसंघात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. यंदा मतदारसंघात काट्याची दुरंगी लढत पहावयास मिळाली. यामुळे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील खासदार रक्षा खडसे यांची हॅट ट्रिक रोखणार? की ताई सलग तिसरा विजय साकारतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.
यंदा उमेदवारी पासून रावेर मधील लढत रोमांचक ठरली. उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्हे असताना भाजपने खडसेंनाच तिकीट दिले. यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी राजीनाम्याचा धडाका लावला.जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजपचे संकट मोचक यांनी या नाराजांची समजूत घातली.
मात्र आतील नाराजी गेली का ही महत्वाची बाब आहे. विकास कामे व संपर्क या मुद्यावर खासदार खडसे यांना प्रचारात त्रास झाला. मात्र त्यांनी अडचणींवर मात करून प्रचाराला वेग दिला. त्यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभा , नरेंद्र मोदी यांची विकासकामे , तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यावर प्रचारात दिलेला भर, सासरे एकनाथ खडसे यांनी प्रचारात घेतलेला सक्रिय सहभाग या बाबी ताईंसाठी जमेच्या बाजू ठरल्या.
राजकारण, निवडणूक लढण्याचा अनुभव या बाबतीत त्या इतर उमेदवारांच्या तुलनेत वरचढ ठरल्या. निर्णायक संख्येतील लेवा पाटीदार गुजर समाजाचे गठ्ठा मतदान ही त्यांची ताकद आहे.
डॉक्टर पत्नीला एका हॉटेलमध्ये 2 प्रियकरांसोबत नग्न अवस्थेत रंगेहात पकडलं पतीने मग?( Love story )
आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राजकारण व समाजकारण मध्ये नवीन आहे. मात्र मतदारसंघातील बहुसंख्याक मराठा समाजाचे त्यांना मोठे पाठबळ मिळाले. याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस ची पारंपरिक मते त्यांच्यासाठी बोनस ठरला. नवखे असूनही त्यांनी बऱ्यापैकी प्रचार करीत आपले आव्हान उभे केले. विदर्भा प्रमाणे मुस्लिम व बुद्ध समाजाची मते त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
असे झाल्यास ही लढत खडसे यांच्यासाठी सोपी ठरणार नाही.यामुळे यंदाची लढत रक्षा खडसे यांच्यासाठी एकदम सोप्पी नक्कीच नाही.इतिहास आणि वर्तमान
खान्देशातील लोकप्रिय नेते हरिभाऊ जावळे यांनी 2007 आणि 2009 या दोन लढतीत सलग विजय मिळविला. मात्र त्यांचे तिकीट कापून नवख्या रक्षाताईंना 2014 मध्ये संधीदेण्यात आली. मोदी लाटेत त्या साडे
सहा लाखांवर (6,55,386)मतदान घेऊन विजयी झाल्या.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काँग्रेसचे उल्हास पाटील यांना जेमतेम 3लाख 11 हजार पर्यंत मजल मारता आली. यंदा खासदार आपली हॅट ट्रिक करतात की पाटिल त्यांना पराभूत करण्याचा चमत्कार करतात का याकडे 18लाख21 हजार 750 मतदारांचे लक्ष लागले आहे.
loksabha:इतर समाजाची मतेही निर्णायक!
दरम्यान ही लढत लेवा विरुद्ध मराठा अशी असल्याचे चित्र रंगविण्यात आले. मात्र मतदारसंघात चांगले मतदान असणारे समाज देखील निकालात महत्वाचे ठरणार आहे. इतर समाजाची जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराला विजयाची जास्त संधी असे मानले जात आहे.