बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द भाजप लोकसभा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकविले आहे.
यामुळे युतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने आज संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क करून शिंदेंना उध्या रविवारी नागपुरात पाचारण केले आहे.loksabha
आज शनिवारी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष गणेश मानटे व आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या भेटी नंतर प्रदेश कडून हे फर्मान देण्यात आले आहे.
शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपात बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवारी (दि ५) झालेल्या छानणीत त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला, पण अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आणि बंड खोरी कायम आहे.
मित्रानेच केले मित्रावर अनैसर्गिक कृत्य ..आरोपीवर गुन्हा दाखल ( crimenews )
यामुळे वरील दोन नेत्यांनी आज संध्याकाळी ६ वाजता बुलढाण्यातील विष्णुवाडी स्थित शिंदेंचे निवासस्थान गाठले! या तिघांमध्ये चाललेली दीर्घ चर्चा रात्री ८ वाजता आटोपली.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादरम्यान बावनकुळे यांनी शिंदे व महाले यांच्यासमवेत चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने शिंदे, महाले ,मानटे, दीपक वारे, यांना थेट नागपुरात पाचारण करण्यात आले आहे.
loksabha:उध्या रविवारी दुपारी बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही निर्णायक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.