प्रतिनिधी अशोक भाकरे
आगर, पोलीस स्टेशन उरळ दिनांक 10/12/2022 रोजी शेतकरी फिर्यादी नामे मंजूर सुभान देशमुख वय 70 वर्ष रा. लोहारा ता बाळापुर अकोला यांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की त्यांनी त्यांचे गाव लोहारा येथील शेख नूर शेख कासम यांचे शेत ठोक्याने पीक काढण्याकरिता केलेल्या शेतातील विहिरीमधील सीआरआय कंपनीच पानबुडी मोटार पंप किंमत अंदाजे 40000/- रुपये असा कोणीतरी अज्ञात इसमानी दिनांक 07/12/2022 चे रात्री दरम्यान चोरून नेली आहे अशा फीचे जबानी रिपोर्ट कलम 379 भादवी प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता तात्काळ ठाणेदार वडतकर साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास पथक तयार करून ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर ग्राम लोहारा येथील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी नामे 1. प्रीतम आनंदा मोरे वय 22 वर्ष, 2. युवराज अविनाश मोरे वय 21 वर्ष दोन्ही रा. लोहारा यांना अटक करून त्यांचे जवळून चोरीस गेलेला CRI कंपनीची पानबुडी मोटार पंप किंमत अंदाजे 40000/- रु. चा जप्त करण्यात आला आहे.
कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,Asi राजाभाऊ बच्चे , PC सुनील सपकाळ, हरिहर इंगळे ,शैलेश घुगे, ठाकूर मेजर व दहलीवाले यांनी कार्यवाही केली.