इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव -krushiutpannabajarsamiti: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने नाफेड ची शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन या शेतीमालाचे खरेदीचा शुभारंभ उपबाजार माटरगाव बु. येथे बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे यांचे हस्ते करण्यात आला.
बाजार समिती मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सबएजंट म्हणून सदर खरेदी करीत असून सोयाबीन या शेतमालाला रुपये 4600/- हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांकरिता शेगाव व माटरगाव या दोन्ही ठिकाणी नोंदणी करिता व्यवस्था केली असून शेतकऱ्यांनी सन 2023-24 या वर्षाचा अद्यावत पीक पेरासह सातबारा, बँक पासबुक लिंक असलेले आधार कार्ड ची स्पष्ट झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा
कॅन्सल चेक, व नोंदणी अर्ज भरून वरील कागदपत्रे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पर्यंतच घेऊन येऊन बाजार समितीचे मुख्य बाजार शेगाव किंवा उपबाजार माटरगाव येथे शेतकऱ्यांनी सादर करावित व आपला नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन यावेळी बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन आलेल्या बेलुरा येथील शेतकरी प्रभाकर रामचंद्र सुलतान तसेच माटरगाव येथील शेतकरी सिकंदर हकीमखा पटेल यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांनी शेला,टोपी, श्रीफळ व हार घालून सत्कार केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव आळशी, सुरेशभाऊ वनारे, राजेश बाजारे, बाजार समितीचे संचालक दादाराव निळे पाटील, परमेश्वर हिंगणे, श्रीधर पुंडकर, माजी संचालक अनंत मिरगे, संचालक तेजराव दळी, रमेश पाटील, संजय गव्हांदे इत्यादी मान्यवरांसह भीमराव वाकोडे, अभिजीत मिरगे, किशोर मिरगे, विठ्ठल सोनटक्के, बाळूभाऊ निखाडे, बाळकृष्ण देशमुख,
krushiutpannabajarsamiti: नंदू अमलकर, गजानन बाजारे, पिंटू टिकार, बबलू नरवाडे, गजानन कानडे, दिनेश खंडारे, शिवाभाऊ वावटीकार, खरेदी विक्री अध्यक्ष रघुनाथ पाटील भांबेरे, खरेदी विक्री व्यवस्थापक मनोहर ताठे, मापारी रियाज उल्लाखा ताऊल्लाखान, बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर, निरीक्षक नागोराव डाबेराव, लिपिक दीपक कडाळे, रितेश मेटांगे, संगणक चालक नितीन तायडे, प्रशांत घोडेराव, जानू वाकोडे यांचे सह माटरगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.