शेतकरी पुत्राने स्विकारला कृषी अधिकारी पदाचा कार्यभार.(krushinews)

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

krushinews:लोणार तालुक्यातील वझर आघाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर रामप्रसाद आघाव यांचे सुपुत्र अमोल रामेश्वर आघाव यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जांब बाजार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून पदभार स्विकारत वझर आघाव सह आपले आईवडील नातेवाईक व शिक्षक वृंदाचा अभिमान वाढवला आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वझर आघाव येथे घेत इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय शेगाव येथे पात्र झाला.आणी तेथून पुढे आपल्या बुद्धीच्या बळावर बीएससी ऍग्री करत एमपीएससीचा अभ्यास केला.

आणि काही दिवसांपूर्वीच आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एमपीएससी परीक्षा पास होत कृषी अधिकारी वर्ग दोन साठी पात्र झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा भव्य नागरी सत्कार केला होता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घरची परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी अंगी इच्छाशक्ती , जिद्द असेल तर माणूस कितीही मोठ्या पदांवर पोहचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमोल आहे.

krushinews:त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील नातेवाईक व शिक्षक व मित्रपरिवार यांना देत त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण या पदावर पोहचलो असुन आपण शेतकरी पुत्र असल्यामुळे आणि आपल्याला नोकरीही शेतीच्या संबंधित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण आनंदी असुन या पदाला निरपेक्ष भावनेने करणार असल्याचे महाराष्ट्र लोक न्युज च्या प्रतिनिधी सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment