प्रतिनिधी सय्यद जहीर
krushinews:सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या फवारणी पंप वाटप करतेवेळी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पन्नास 50 रुपये व काही गावांमध्ये 300 रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रविकांत तुपकर युथ
फाऊंडेशनचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गोरगरीब शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले होते.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
सदर फवारणी पंप हे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळाले होते शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सदर फवारणी पंप हे कोणत्याही
प्रकारची फी न घेता देण्यात येणार होते परंतु लोणार तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप करण्यात आले त्या शेतकऱ्यांकडून लोणार तालुका कृषी विभागाच्या
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कर्मचाऱ्यांने प्रत्येकी पन्नास रुपये घेतले तरी शेतकऱ्याकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रविकांत तुपकर युथ
krushinews:फाऊंडेशनचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली आहे तालुका कृषी अधिकारी व पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास रविकांत तुपकर युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.