इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव: खामगाव ते अमरावती अशी मेमो ट्रेन सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्यावतीने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनद्वारे करण्यात आली आहे. अमरावतीच्या महिला खासदार नवनीत कौर राणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की विधर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्यातील सर्वांतमोठी व्यापार पेठ आणि सर्वात मोठे महत्त्वाचे शहर असलेल्याव मुंबई कोलकात्ता मध्यरेलवे लोहमार्गाच्या भुसावाळरेल्वे डिविजन मध्ये येणाऱ्या जलंब या लहानश्या रेल्वे स्टेशन पर्यंत खामगाव येथून सद्यस्थिती मध्ये 3 डब्यांची ट्रेन चालविली जाते.
खामगांव हे शहर अमरावती महसूल विभागात येत असल्याने तसेच शैक्षणिक व ईतर महत्वाच्या कामासाठी खामगाव व परिसरतील नागरीकांना दररोज अमरावतीला जावे लागते खामगांव येथून अमरावतीला जाण्यासाठी बस किंवा ट्रेवल्स शिवाय पर्याय नाही.त्याकारनाने नागरीकांना मानसिक आणि शारीरिक त्रास तर सहन करावा लागतो वेळेचासुद्धा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो.त्यामुळे खामगाव परिसरातील रहिवासी व्यावसायिक महिला प्रवासी, विद्यार्थी यांच्या सुविधे साठी खामगाव येथूनअमरावती पर्यंत मेमो ट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
रेलवे प्रशासनाला खामगाव येथून अमरावतीला मेमो ट्रेन सुरु करण्यासाठी एक रुपया देखील अतिरिक्त खर्च करावा लागनार नाही.आणी रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसुलसुद्धा प्राप्त होईल.असेही या निवेदनात म्हटले आहे.
खासदार नवनीत कौर यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, विदर्भ ऊपाध्यक्ष मनिषाताई टाकसाळ,लिनाताई पाचबोले,रुपाली वानखडे,फुलाबाई राठोड, रजनी चव्हाण,ज्योतीताई बावस्कार,नलिनी राऊत,कुसुम चौहान, जेष्ठ पत्रकार राजकुमार व्यास,युवराज चौहाण,विनय चौहान, आदी सह अनेक जन उपस्थित होते navneetrana