Jigaon praklap /जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढा….

 

शेगाव :- गेली काही वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम चालू आहे.

या प्रकल्पामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांची शेती ही जात असून त्यामध्ये काही गावातील शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळून झाला तर अनेक गावातील शेतकरी हे अद्याप पर्यंत आपल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे चिंतेत पडलेले आहे.

तसेच अनेक गावातील पुनर्वसन गावठाण चे प्रश्न सुद्धा जैसे थे असल्यामुळे ही सुद्धा प्रकल्पग्रस्त लोकांची डोकेदुखी ठरत आहे.

हे सर्व प्रश्न आज सातळी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी विदर्भ विकास पाटबंधारे कार्यालय शेगाव येथे जाऊन कार्यकारी अभियंता हजारे साहेब यांची भेट घेतली.

त्या भेटी प्रसंगी गावातील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Jigaon praklap

 

Leave a Comment