आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

 

ग्रामस्थांनी एक झाड लावून झाड जगविण्याचा केला संकल्प.

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

ideal village:लोणार तालुक्यातील भुमराळा येथे ग्रामपंचायत भवन परिसरात “जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने दिनांक 5 जुन 2024 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वच ठिकाणी सध्या वृक्षतोड जोरात चालू आहे. परंतु जितके झाडे तोडले जातात तेवढी झाडे लावल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे.

त्याचे परिणाम संपूर्ण जगच भोगत आहे. वाढणारे तापमान ,अवेळी पडणारा अवकाळी पाऊस , अचानक वातावरणात होणारे बदल हे त्याचे परिणाम आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी (  prataprao jadhav )

निसर्गाचा समतोल जर राखावयाचा असेल तर वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करून जगवण्याचा संकल्प व निर्धार सुद्धा यावेळी करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच संतोष प्रल्हाद मोरे ,सचिव एस एम राठोड ,ग्राम कार्यकर्ता लक्ष्मण मुकुंदा टेकाळे ,ग्रामपंचायत सदस्य आनंद डोळे ,भगवान मोरे ,ग्रामपंचायत कर्मचारी समाधान चौधरी ,अनिल मुळे, केशव सरवटे, पत्रकार देवानंद सानप ,अंगणवाडी सेविका सौ. मीना काळे ,सौ .संगीता चव्हाण बचत गटांच्या सीआरपी सौ. आनिसाबी शाहा,सौ .सुजाता म्हस्के ,ग्राम संघाचे लीपिका सौ. शितल टेकाळे ,

ideal village:जिजामाता क्रीडा व बहुउद्देशीय संस्था दगडवाडी देऊळगाव राजा चे अध्यक्ष गजानन जायभाये, उदय डोईफोडे ,प्रकाश बोंद्रे आधी प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर गावातील सुरेश बोरुडे ,राहुल मस्के ,अनिल मस्के ,राजु मस्के, गणेश सरकटे ,याकूब शहा आशा वर्कर अंजना टेकाळे ,उषा पैठणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Comment