Home Loan:9 एप्रिलच्या दिवशी, मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली.
या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना होम लोनसाठी दिलासा मिळणार आहे.
PoliceNews / पोलिसांच्या हातात लागला 500 रुपयांच्या नोटांचा विचित्र खोके
रेपो रेट हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतल्यावर द्यावा लागणारा व्याज दर आहे, ज्यामुळे बँकांना कमी व्याज दराने कर्ज मिळतं आणि त्या ग्राहकांना सुद्धा कमी दराने कर्ज देऊ शकतात.
किती होणार बचत?
जर तुमच्या गृहकर्जाचा व्याजाचा दर 8.25 टक्के आहे आणि कालावधी 20 वर्ष असेल, तर 20 लाखाच्या कर्जासाठी वर्षाला 3 हजार 744 रुपयांची बचत होणार आहे.
30 लाखांच्या कर्जासाठी वर्षाला 5 हजार 628 रुपयांची तर, 50 लाखांच्या कर्जासाठी वर्षाला 9 हजार 372 रुपयांची बचत होईल. यामुळे होम लोन घेतलेल्या कर्जदारांना आर्थिक फायदा होणार आहे.
धोरणात बदल
रिझर्व्ह बँकेने पतधोरणाची दिशा महागाई नियंत्रणाच्या ऐवजी अर्थव्यवस्थेच्या विकासावर केंद्रित केली आहे.
HomeLoan:रेपो दरातील ही कपाती जागतिक अर्थव्यवस्थेच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर उचितच मानली जात आहे. भविष्यात व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता आहे, किंवा ते अजून कमी होऊ शकतील.