Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

0
135

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews:हिंगणघाट : आधार फाऊंडेशनची वार्षिक सभा नुकतीच आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष जगदिश वांदिले आणि विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

आधार फाऊंडेशनच्या घटनेनुसार दरवर्षी नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येत असल्यामुळे वर्ष 2025 -26 साठी आधार फाऊंडेशनची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली. यात कार्यकारी अध्यक्ष – माधुरी शरद विहीरकर, उपाध्यक्ष अँड .इब्राहिम हबीब बख्श,सचिव सुनिल डांगरे, सहसचिव सुभाष शेंडे,कोषाध्यक्ष सुरेश गुंडे यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष जगदीश वांदिले यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करून नवीन वर्षात विविध उपक्रमे आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी नव्या कार्यकारणीला दिल्या.

यावेळी मावळते कार्यकारी अध्यक्ष जगदीश वांदिले व संस्थापक अध्यक्ष अतुल वांदीले याच्या हस्ते नवीन कार्यकारी अध्यक्ष माधुरी शरद विहिरकर यांचा व नवीन कार्यकारनी चा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सभेचे सुत्रसंचालन पराग मुडे यांनी केले तर आभार चंद्रशेखर निमट यांनी मानले.

Hingnghatnews:यावेळी डॉ.नरेंद्रकुमार मनवर, लक्ष्मीकांत धार्मिक, प्रा. डॉ.शरद विहिरकर, सुहास घिनमिने, डॉ. संजय हिवरकर,डॉ.गिरीधर काचोळे, प्रमोद बोरकर,सचिन येवले,प्रा.अभय दांडेकर,गणेश जोशी, डॉ.अनिता मनवर,माया चाफले, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, स्वाती वांदिले, वीरश्री मुडे, अनिता गुंडे आदीं सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here