शालेय पोषण आहारात विद्यार्थाना विषबाधा प्रकरणात मनसे आक्रमक(hingnghatnews)

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

hingnghatnews:हिंगणघाट :- गेल्या काही दिवसात वाघोलीला घडलेल्या 57 निष्पाप विद्यार्थाना विषबाधा झाली प्रकरणात मनसेने घेतली दखल व गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना हिंगणघाट शहर अध्यक्ष याच्या नेतृत्वात दिले निवेदन व निवेदनातून कळविण्यात आले कि ज्या अधिकाऱ्यांचं निष्काळजी पणे मुळे ही धक्कादायक घटना घडली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

त्या संपूर्ण अधिकार्यावर कारवाही करून तात्काळ निलंबित करा व विषबाधित मुलांना आर्थिक साहाय्य गोषित करा अश्या मगण्या करण्यात आल्या मनसेची टीम वाघोली जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यास तिथल्या इन्चार्ज कडून माहिती मिळाली कि शालेय पोषण अधिकाऱ्याचा गेल्या चार वर्षातून एकही राउंड झालेला नाही.

व गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सुद्धा राउंड झालेला नाही त्यामुळे समोर मोठा प्रश्न उभा होतो कि शालेय पोषण अधिकाऱ्यां शिवाय आहाराला संमती कशी मिळाली
फक्त मुख्याध्यापकच नाही तर शालेय पोषण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ज्याला आहाराच टेंडर देण्यात आले या सर्व अधिकाऱ्यावर चौकशी करून गुन्हास्पद आढलल्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे असा इशारा मनसेनी दिला.

आणि गट विकास अधिकाऱ्याला निवेदनातून सांगण्यात आले कि हे फक्त शांती निवेदन आहे पण याला फक्त निवेदन समजून फाईल मध्ये ठेऊ नये तर 15 दिवसात तात्काळ करवाही करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीच अंदोलन कराला भाग पाडू नका याची दखल आपण गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणून घ्यावी समोरील आक्रमक आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना किव्हा पदधिकारी जवाबदार राहणार नाही.

hingnghatnews:याची दक्षता घ्यावी हा संपूर्ण हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे याच्या आदेशानुसार तसेच जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर व तालुका अध्यक्ष पवन तडस याच्या मार्गदर्शनातं व हिंगणघाट शहर अध्यक्ष केतन तायवाडे याच्या नेतृत्वात घेण्यात आला यावेळेस उपस्तिथ शहर उपाध्यक्ष रमेश राऊत,कामेश बावणे, तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले,तालुका संघटक देवा काटकर, शहर सचिव योगेश नासरे, शहर संघटक स्वप्नील दाते, अजय खंदार, गोलू नरवडे,राम कांबळे,अनिकेत वानखेडे, अभिजित तायवाडे,राज भस्मे,लकी कासारे, मंगेश ससाणे आकाश पोटफोडे,सर्कल अध्यक्ष सागर घवघवे, सुरज तिमांडे, अक्षय थुल,अविनाश थुल, दिक्षु थुल इत्यादीची उपस्तीथी होती

Leave a Comment