गुणवंतविद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या हस्ते संपन्न.( Hingnghat )

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:गिरड : दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी उपस्थित कामगार नेते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक.

तसेच गिरड ग्रामपंचायतचे सरपंच राजू नौकरकार. निर्भिड लोक क्रांतीचे संपादक व सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर गजानन गारघाटे सर. समाजसेवक विनोद येनोरकर. गजू धात्रक. राजू बोबडे. अरविंद तामगाडगे.

व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते. डॉक्टर उमेशजी वावरे सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच करणार असाल तर जाणून घ्या नियम ( hartalika )

डॉ. उमेश वावरे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना एक ऊर्जा त्यांच्यात कशी निर्माण होईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व पुढील वाटचालीस गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी विकास विद्यालय गिरड चे विद्यार्थी S.S.C. परीक्षा उत्तीर्ण होऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला यामध्ये पियुष सुधाकर मोटघरे 92.60%. समीक्षा खुशाल गाठे 86.60%. किंजल संजय पानबुडे86.20%. साक्षी संजय वांदिले 86.60%. जिया देवानंद लोहकरे84.80%. तसेच H.S.S.C. परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

Hingnghat:कल्याणी रमेश कापटे.74.50% सलोनी चंद्रभान लोहोट 73.00% तसेच जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा गिरड चे विद्यार्थी श्रुती विकास वाघे वर्ग 7वा प्रथम क्रमांक व समीक्षा रमेश बावणे वर्ग सातवा द्वितीय क्रमांक घेऊन या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे गिरड गावाचे तालुक्याचे नाव जिल्ह्यात लौकिक केले.

Leave a Comment