महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलिंची विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड.(Hingnghat )

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयामार्फत दि.

ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सत्कार ( lonarnews )

5 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यात महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलींनी न्यू इंग्लिश स्कूल, वर्धा विरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महेश ज्ञानपीठ शाळेने 19 वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सलग 6 वर्षे विजेतेपद पटकावले आहे.या विजयाचे श्रेय संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधर राठी, सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ यांना दिले.

उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रीडा अधिकारी सायली चन्नावर, तालुका क्रीडा समन्वयक बी. एल.खांद्रे, क्रीडा शिक्षक मुस्तफा हबीब बक्ष, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार यांच्यासह सर्व शिक्षकांना त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment