प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट :- शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने नागपूर चे प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना भ्रमणदूरध्वनी द्वारे (फोन) महाराष्ट्राचे आराध्य दैवत *राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराजयांच्या बदल अर्वाच्य भाषेत संभाषण करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या
बद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख,सतीश धोबे, श्रीधर कोटकर,मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट पोलीस निरीक्षक ठाकूर यांना प्रशांत कोरटकर यांना अटक करण्याकरीता निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यापूर्वी हिंगणघाट पोलीस स्टेशन चे नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक श्री. ठाकूर साहेब यांना शिवसेना हिंगणघाट शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बोलिव्हियामध्ये भयंकर अपघात: ३७ जणांचा मृत्यू, ३९ जखमी( accdent news )
सविस्तर असे की, जेव्हा पासून भाजपाचे शासन या देशात आणि राज्यात आले तेव्हा पासून कोणत्या ना कोणत्या विषयाला धरून महाराष्ट्राचे दैवत *राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, आणि परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर** यांच्या बाबत चुकीचे विधान करण्याची एका विशिष्ट वर्गातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी मालिका सुरू केली आहे.
हे सर्व असूशिक्षित नाही .परंतु एका ऐजंडा च्या मार्फत जाणुन – बुजून चुकीचे विधान केल्या जात आहे. जेणेकरून बहुजन समाज आप-आपसात विखुरलेल्या अवस्थेत असला पाहिजे.व या बहुजन समाजाच्या डोक्यात चित्रपटाच्या माध्यमातून असो किंवा असे चुकीचे विधान करून एका विशिष्ट समाजाकडे बोट दाखवून हाच तुमचा खरं शत्रू आहे.
असे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे.बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की ही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. नवीन तरुण पिढीला शिक्षणापासून वंचित राहून असल्या विषयाकडे वळविण्याचे प्रामाणिक प्रयत्न भाजप समर्थीत लोकांचा आहे.व स्वतःचे मुले असल्या गोष्टी पासून दूर ठेवून देशात आणि परदेशात उच्चशिक्षण घेत रहावे असा त्यांचा ध्यास आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दोन दिवसांपूर्वी पुन्हा तोच प्रकार झाला नागपूर चे एका व्यक्तीने कोल्हापूर चे इतिहासकार श्री. इंद्रजित सावंत यांना भ्रमण दूरध्वनी द्वारा फोन करून या महापुरुषांच्या संदर्भात चुकीचे विधान करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असल्या लोकांना कोणाचे पाठबळ आहे. याची संपूर्ण माहिती या महाराष्ट्र द्वेषी कोरटकरला अटक केल्या नंतर बाहेर येईल. असल्या लोकांना अप्रत्यक्षपणे कोणाचे संरक्षण आहे , हे लक्षात येईल. असली माणसं या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Hingnghat:असे आमचे शिवसेनेचे म्हनणे आहे.या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावे ,जेणे करून पुढे कोणाचीही अशी हिम्मत होणार नाही. जर गृह विभागाने त्याला अटक केली नाही तर , शिवसेना ( उध्दव बा. ठाकरे ) पक्षाच्या वतीने या विषयाला घेऊन रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही .आणि पुढे काही झाल्यास याची सर्वस्वी जवाबदारी शासन व प्रशासनाची राहील. निवेदन देताना उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, सुनील आष्टीकर, शंकर झाडे, गजानन काटवले, अनंता गलांडे,राजू मंडलवार,चंदू भुते, शंकर मोहमारे, पप्पू घवघवे,अविनाश धोटे, प्रशांत कांबळे, अमोल वादाफळे,भास्कर मानकर,शकील अहमद,पंकज ठाकरे, स्वप्नील नगराळे, शंकर भोमले,गणेश ढेकले उपस्थित होते.