परोपकारीवृत्ती जोपासत दिव्यागांना साहीत्यवाटप करून शिवरायांची जयंती साजरी(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट : शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर द्वारा आयोजित दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

याकार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे.

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:त्यांचे खासदार अमर काळे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल,शहराध्यक्ष बालू वानखेडे, सहकार नेते वासुदेव गौळकर,समाजसेवक सुनील डोंगरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,साहेबराव येडे,महिला शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी,सुचिता सातपुते, मीनाक्षी सोनटक्के, मीनाक्षी धाकने,विद्या गिरी, आचल वकील, दिपाली रंगारी, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Comment