स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष तर्फे निषेध मोर्चा.(hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट शहर व ग्रामीण शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा तर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसविल्यास धोके व अडचणी बाबत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे ,तथा माझी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तसेच तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय, हिंगणघाट यांना शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक पासून कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पर्यंत समाजाच्या हितासाठी शिवसेना परत एकदा रस्त्यावर पाई चालत जाऊन धडक मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले.

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेवर चर्चा सुरू असताना, योजनेची संबंधित काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. सरकार आणि महावितरण कंपनीने योजनेचे समर्थन करताना दिलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव अधिक चिंताजनक आहे. स्मार्ट मीटर ची किंमत रुपये २६१०/- सिंगल फेज,व ४०५०/- थ्री फेज आहे. मात्र प्रीपेड मीटर साठी प्रत्यक्ष खरेदी मध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजे ११९८७/- झाली आहे.

त्यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. याशिवाय मीटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही. प्रीपेड मीटर साठी होणारा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकाकडून वसूल केला जाणार आहे. अंदाजे ३०/- पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल.त्यामुळे वार्षीक तीन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल.

तसेच ग्राहकांचे हक्क वीज कायदा २००३ च्या कलम ४७ (५) नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटर साठी सक्ती केली जात आहे. त्यामुळे कायद्याचे उलंघन होत आहे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या भागामध्ये रिचार्ज प्रक्रिया अडथळे येतील .अशा परिस्थितीत ग्राहकांना वारंवार डिस्कलेक्शनला समोरे जावे लागू शकते. राज्यातील २ कोटी लहान ग्राहकांना प्रीपेड मीटर योजनेचा कोणताही फायदा होणार नाही. उलट त्यांना अतिरिक्त खर्च आणि तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागेल .१०० युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा भार टाकला जात आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

तसेच प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीनंतर महावितरणच्या अकाऊंट आणि बिलिंग विभागातील सुमारे २०००० आणि मीटर रिडिंग करणारे ३०००० रोजगार कायमचे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती ही प्रभावित होणार आहे .या केंद्र सरकारच्या धोरणानुसार विज क्षेत्राचे खाजगीकरण हळूहळू सुरू आहे.

hingnghat:ही अत्यावश्यक सेवा रहण्याऐवजी खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी वस्तू बनेल. ज्यामुळे ग्राहकाचे शोषण होण्याची शक्यता दाट आहे.
या मोर्चात सहभागी उपतालूकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, भास्कर ठवरे,मनोज वरघणे ,गोपाल मेघरे ,शितल चौधरी ,पप्पू घवघवे,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,गजानन काटोले, सुरेश चौधरी ,संजय पिंपळकर, शंकर भोमले ,नथूजी कुकडे, प्रशांत सुपारे, गजानन ठाकरे ,अमोल वादाफळे, हेमराज हरणे, विजय कोरडे ,बलराज डेकाटे, शंकर झाडे ,संजय रहाटे ,घनश्याम येडे ,गजानन सातारकर, फिरोज खान,राजू मंडलवार, हिरामण आवारी ,भास्कर कोल्हे ,शकील अहमद ,श्रीकृष्ण रामगडे,दिलीप वैद्य, श्रीरंग चंदनखेडे,प्रशांत कांबळे ,गजानन साखरकर, वसीम शेख, अतिक मिर्झा, रमेश तामगाडगे ,नरेश तामगाडगे ,सोनू भगत,लक्ष्मण कापकर ,विनोद दांरुडे ,अमोल चिंचाळकर, गुणवंत वानखेडे,विनोद दारूंडे, रवी बागडे ,गोवर्धन शाहू, भोला ठाकूर , चंगेज खान, राजेश बोंडे ,मारुती अराडे, दिनेश धोबे,सुनील आष्टीकर, संतोष गाले,विनोद मोहोड, प्रकाश भुसारी, किशोर इंगोले, सतीश मसराम,अरविंद झिलपे,शुभम धनगाये, नितीन कोल्हे, अनिल मानकर, अविनाश धोटे,राजू बोडे,दिलीप जाधव,मनोज सावंत,संजय गिरडकर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment