कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त महाआरोग्य शिबिर संम्पन्न(hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट :- कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विकी वाघमारे व मित्रपरिवार यांच्या वतीने दी. 24 /12/2024 मंगळवारी शिव मंदिर यशवंत नगर हिंगणघाट येथे निशुल्क महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये ४९९ तपासण्या करण्यात आल्या या मध्ये मशीनद्वारे ईसीजी तपासणी,जनरल सर्जरी विभाग,हृदयरोग तपासणी,अस्थिरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी, दंत तपासणी, श्रयरोग तपासणी, वातरोग तपासणी,रक्त तपासणी,टीबी तपासणी,एमडी मेडिसिन,जनरल फिजिशियन,जॉईंट रिप्लेसमेंट तपासणी व विविध तपासणी करण्यात आल्या व प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50,000/- रू दंडाची शिक्षा(courtnews)

सामान्य नागरिकांना निशुल्क उपचार मिळाले यासाठी विकी वाघमारे व मित्रपरिवार तर्फे दरवर्षी महाआरोग्य शिबीर शहरात राबविण्यात येते.

हिंगणघाट येथील सार्वजनिक आरोग्य विभाग,उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या या विशेष प्रयत्नाने हे महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले या शिबिराचे उद्घघाटक म्हणून हिंगणघाट येथील सुप्रसिद्ध डॉ.निर्मेश सुधीर कोठारी,तर प्रमुख अतिथी म्हणून
डॉ.विशाल भास्कर कलोडे,डॉ. सोनाली वाघमारे,डॉ. स्नेहल चौधरी,डॉ.अजय गिंदेवार,डॉ. अतुल वाघमारे,डॉ.गिरीश वरभे,डॉ.मनीषा भाईमारे,डॉ. श्रद्धा वाघमारे,डॉ.प्रियंका शेडांबे,डॉ.सोनल जुगणारी होते,पारडीचे सरपंच अलका दिनकरराव पवार व माजी नगरसेवक मनीष देवडे उपस्थित होते.

शिबिराचे उद्घघाटन कर्मयोगी गाडगेबाबा महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करीत महाआरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आले.

महाआरोग्य शिबिरामध्ये डॉक्टरांचा महाआरोग्य शिबिरामध्ये निशुल्क तपासणीचा लाभ घेणाऱ्यांच्या तपासणी केल्या.
महाआरोग्य शिबिरात विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय,व पत्रकार बंधूंनी महाआरोग्य शिबिरात व मोठ्या प्रमाणात नागरिकांनि आपली उपस्थिती देत आयोजक विकी वाघमारे व मित्र परिवारांचे शिबिराबद्दल अभिनंदन केले.

hingnghat:यावेळी रितिक मोघे,प्रज्वल धाडसे,सुरज गावंडे,अभय दारोंडे,प्रतिक शंभरकर,किट्टू नाईक,सुबोध गायमुखे,कोमल वावरे, टिंकू ढेपे, अभिजित गावंडे,प्रतीक धाडसे,मंथन इंदूरकर, अनिकेत तेंबूरणे,शुभम सोरदे,कुणाल कळसकर,हिमांशू गावंडे,उद्देश कांबळे,नितीन इंदूरकर,अनिकेत अष्टेकर,प्रेम जवादे,पराग चंदनखेडे, उद्देश कांबळे उपस्तित होते.

Leave a Comment