रेती तस्करी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक.(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट;- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू है असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील येळी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी (सेवा) वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो, तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे.

वना, वर्धा नदीवर असलेले जवळ जवळ सर्व वाळू घाट या रेती डेपोला जोडले आहेत. मात्र या डेपोवर रेती न टाकता है डेपो धारक नदीत अनधिकृत रित्या पोकलॅन्ड मशीन, यांत्रिकी बोट लाऊन टिप्पर च्या माध्यमातून नदीपात्रातून २४ तास थेट विक्री करत असून शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवीत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कार्यालया पुढून देखील सर्रास २४ तास आणि देखत वाळू भरलेल्या गाड्‌या घेऊन जातात. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि हि ग्रुप पणे विक्री केली जात आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यामुळे शासनाने या सर्व वाळू डेपो वरील व वाळू घाटावरील व्हिडिओ रेकोर्डिंग आम्हाला घ्यावी तसेच या सर्व अनधिकृत वाळू तस्करीवर कुठल्या पद्धतीने कारवाई करणार या बाबत आमच्याशी चर्चा करावी. या संपूर्ण वाळू डेपो आडून एकही गाडी वाळू चोरी आम्ही करू देणार नाहीत. वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. नियमानुसार वाळू घाटात जाणार्या डेपो धारकांच्या गाड्‌याची यादी व जीपिएस ट्रकर नंबर आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावे.

रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाहीत. शासन रेती तस्कारीवर आळा लावण्यात असमर्थ ठरल्यास रस्त्यावर उतरून मोठ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल तसेच विधानभवनात या बाबत प्रश्न उपस्थित केला जाईल असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, कृषि सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे,

Hingnghat:समाजसेवक सुनिल डोंगरे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,श्रीकांत भगत,माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार,अमोल बोरकर,विजय तामगाडगे,राजेश भाईमारे,सिंदी रेल्वे युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, हिंगणघाट तालुका युवक अध्यक्ष राहुल वानखेडे,सुनिल भुते,महादेव वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, उमेश नेवारे,अनिल लांबट, अजय पर्बत,मनोज मुरार, आशिष जाधव, नितीन भुते, सिद्धार्थ मस्के,प्रवीण कलोडे,संदीप सोनटक्के, गजानन महाकाळकर,विष्णू वाघमारे,करीम खान, सुनिल घोडखाडे, प्रवीण भुते,विशाल घोडे,सुशील घोडे, विपुल थुल,राहुल जाधव,आकाश हूरले, दौलत येलगुंडे, खुशाल चौधरी, विशाल माथनकर,नंदू काळे, कुणाल गोल्हर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment