प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट –
Hingnghat:तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक हनुमान वार्ड मधील हनुमान मंदिरात ह. भ.प. राजा महाराज शेंडे ,ह.ब.प दिलीपराव डहाके ह भ प मोहन महाराज गंडाईत यांचे हस्ते श्री संताजी महाराज यांचे पालखीचे पूजन करण्यात आले.
या नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात भजनी मंडळ, लेझीम पथक प्रमुख आकर्षण ठरले. श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य झाकी सुद्धा प्रमुख आकर्षण ठरले.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
ढोल ताशा व बॅण्ड पथकाचे निनादात ,भगव्या पताकासह श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयघोष करीत निघालेल्या शोभा यात्रेत शेकडो समाज बांधव व महिला सहभागी होत्या.या शोभायात्रेचेशहरातील प्रमुख चौकात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.
नागरिकांनी ठिकठिकाणी संताजीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. हिंगणघाट प्रांतीय तैलिक महासंघाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाणी व सरबत वाटप करण्यात आले. ही शोभायात्रा विठोबा चौक, कारंजा चौक, विनायक चौधरी चौक, आंबेडकर चौक मार्गे स्थानिक हरिओम सभागृह येथे भागवताचार्य ह भ प श्री गजानन महाराज कपिले आणि संच यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर कथेची व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते यावेळी काल्याच्या कीर्तनाने शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
Hingnghat:उपस्थित मान्यवरांनी संताजींच्या जीवनावर प्रकाश टाकून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजना करीता समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.