प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
Hingnghat:समाजभवन बांधकाम करिता 2000 स्केवर फूट जागा दान देण्याची गंगाधर कलोडे यांनी केली घोषणा
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
सिंदी (रेल्वे ):- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज शाखा सिंदी (रेल्वे )च्या वतीने बाजार चौकात आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज याची 400 वी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ गंधारे, प्रमुख अतिथी अशोक डांगरे, संजय कोपरकर,गंगाधर कलोडे, सुरेशराव सोनटक्के,याच्या उपस्थितत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम संताजीच्या पुतळ्याचे व प्रीतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ गंधारे यांनी संताजी जगनाडे महाराराजांच्या जीवनचरित्र व कार्यावर माहिती देत प्रकाश टाकला सोबतच संजय कोपरकर यांनी सुद्धा समाज एकत्रीकरणाचे महत्व पटवून देत आपले विचार व्यक्त केले. यावेळी मंच्यावर उपस्थिती गंगाधर कलोडे यांनी समाजभवन बांधकामा करिता 2000 स्केअर फूट जागा दान देण्याची घोषणा यावेळी केली.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत सोनटक्के, प्रस्तावना अमोल सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल गवळी यांनी केले
Hingnghat:कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा चे शहर शाखा अध्यक्ष रामेश्वर घंघारे , सचिव रामभाऊ सोनटक्के यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला वैशाली पेटकर, सविता बुरले, पुष्पा सोनटक्के,स्नेहल कलोडे,प्रशांत कलोडे,किशोर सोनटक्के,प्रभाकर तडस,तेजस सोनटक्के, गणेश काळबांडे, मनोज पेटकर,प्रभाकर कलोडे, जयंत बडवाईक, विनायक सोनटक्के, आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते