होमगार्ड स्थापना दिनानिमित्त श्रमदान करत स्वच्छता अभियान रबावण्यात आले(Hingnghat)

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :-होमगार्ड दिनानिमित्त महासमादेशक होमगार्ड मुंबई यांच्या आदेशानुसार दरवर्षी प्रमाणे हिंगणघाट पथक चे सर्व अधिकारी व सैनिक यांनी श्रमदानातून स्थानिक शमशान भूमी परिसरात स्वच्छता अभियान राबावण्यात आला.

होमगार्ड : (गृहरक्षक दल) . भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली. हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.

6 डिसेंबर होमगार्ड स्थापना दिवस साजरा करत वरिष्ठ पलटण नायक, फिरोज पठाण, पलटण नायक, वसंता नाईक,, अनायुक्त अधिकारी गणेश गेडाम, बावणे, यांना हुद्दा बहाल करण्यात आला

Hingnghat:यावेळी तालुका समादेशक कैलाश रोकडे, कंपनी कमांडर मनोहर ढवळे, वरिष्ठ पलटन नायक फिरोज पठान, पलटन नायक गणेश नौकरकार, आकाश वाकेकर, वसंता नाईक, राजेंद्र लाजूरकर, व समस्त अनायुक्त अधिकारी, व हिंगणघाट होमगार्ड पथक चे समस्त महिला, पुरुष सैनिक, यावेळी उपस्थित होते

Leave a Comment