प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट :- स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतदि. ०५/१२/२०२४ रोजी हिंगणघाट परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरतर्फे खात्रीशिर खबर मिळाली की, गोल बाजार, हिंगणघाट येथील लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरचा मालक सुनिल वनकर हा त्याचे नोकरांचे मदतीने लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर संगणमताने तेथे येणाऱ्या ग्राहकांकडुन नगदी पैशाच्या स्वरूपात रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढया रकमेची ईलेक्ट्रॉनीक मशिनवर चाबी भरून ईलेक्ट्रॉनीक मशिनवर येणाऱ्या फिरत्या आकडयांवर स्वतःचे फायदयाकरीता पैशाची पैज लावून हारजितचा जुगार खेळीतो,
अश्या माहीतीच्या आधारे पोलीस स्टाफसचे मदतीने रेड केला असता सदर ठिकाणावरून चालक नोकर व ग्राहक क्रमांक १) शेख समिर शेख अब्दुल्ला, वय २१ वर्ष, रा. हनुमाण वार्ड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, २) रवि प्रकाश गुप्ता, वय ४४ वर्ष, रा. ग्राम देवखतपुर, तह. सिराथु जिल्हा कौशंबी, उत्तर प्रदेश ह. मु. दिवाकर वाघमारे रा. कलोडे चौक, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांचे राहते घरी किरायाने,
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
३) राकेश रामस्वरूप चौरसिया, वय ५८ वर्ष, रा. ग्राम धमना, तह. जिल्हा फत्तेपुर उत्तर प्रदेश ह.मु. दिवाकर वाघमारे रा. कलोडे चौक, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांचे राहते घरी किरायाने, ४) सुरज भैयाजी काटकर, वय २८ वर्ष, रा. टिळक चौक, नेताजी वार्ड, हिंगणघाट, वर्धा, ५) राहुल विलास वाघमारे, वय २२ वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा ६) विकास प्रकाशराव धनविज, वय २९ वर्ष, रा. आजनगांव, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा, ७)
सचिन रमेश अंबादे, वय ३४ वर्ष, रा. माहत्माफूले वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा, ८) तेजस उत्तमराव गायकवाड, वय ३२ वर्ष रा. भिमनगर, संघमित्रा विहारजवळ, हिंगणघाट जिल्हा वर्धा, ९) वैभव दिलीप माद्देश्वर वय २७ वर्ष, रा. विरभगतसिंग वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा, १०) शेख समिर शेख इस्लाम वय ४८ वर्ष, रा. सेंटर वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा व मालक ११) सुनिल वनकर रा. म्हसाळा, वर्धा
(पसार) यांचेवर जुगार कायद्यातंर्गत कारवाई करून त्यांचे ताब्यातुन १) व्हिडीओ गेम पार्लर मधील १६ इलेक्ट्रॉनीक मशिन त्यांचे चाब्यांसह (ज्यात हाय ५ फाईव्ह, मिनी फ्री प्ले, गेम झॉन, गोल्ड मार्केट, मेट्रो, मास्टर, रेनबो, मिंट, एक्सट्रा अशा कंपनीच्या मशिन आहे.) प्रती मशिन किंमत १३,००० रू. प्रमाणे एकुण कि. २,०८,०००/- रू., २) प्लॉस्टीक चेअर २८ नग प्रती ८०० रू. प्रमाणे २२,४००/- रू. ३) एक व्हिल चेअर किंमत ३,०००/- रू. ४) एक मायक्रोटेक
कंपनीचा इंन्व्हटर किंमत ६,०००/- रू ५) गती ट्रस्ट कंपनीची बॅटरी किंमत १२,०००/- रू. ६) नगदी ३९,०३०/- रू असा एकुण जु.कि. २,९०,४३०/- रू. चा मुद्देमाल पुराव्याकामी ताब्यात घेवून आरोपी क्र. ०१ ते ११ यांचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Hingnghat :सदरची कारवाई मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, अरविंद येणुरकर, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, मुकेश ढोके स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.