प्रतिनिधि। गुड्डू कुरैशी
सप्ताभर वारकरी भजन आणि किर्तनाची मेजवानी
Hingnghat:-सिंदी रेल्वे ता.१: महाराष्ट्रातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र विदेही श्री संत सखुआईचा अखंड हरीनाम पुण्यतिथी महोत्सव सोहळा दिनांक ३१/१०/२४ ते ०७/११/२४ पर्यंत पळसगाव बाई येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री संत सखुआई देवस्थान पंच कमेटी व श्री चे भक्तगण वतीने पुण्यतिथी महोत्सव साजरी करण्यात येते.
प्रसंगी दिनांक ३१तारखेला गुरुवारी अखंड विना प्रारंभ होऊन सप्ताहभर वेगवेगळे उत्सानिमित्त कार्यक्रम भजन व कीर्तन होत असतात,
शुक्रवारी (ता.१) रात्री ८ ते १० पर्यंत वारकरी भजन मंडळ पळसगाव बाई यांचे भजन दिनांक २ ला शनिवार रात्री ८ ते १० पर्यंत श्री संत सखु आई महिला भजन मंडळ पळसगाव दी ३ रो रविवारला रात्री ८ ते १० अमरसती महिला भजन मंडळ पळसगाव सोमवार श्री संत सखु आई महिला भजन मंडळ पळसगाव मंगळवार रात्री ८ ते १० श्री समर्थ गुरुदेव
सेवा मंडळ दहेगाव गो संयोजक ह भ प राजाभाऊ सावरकर दी ६ रो बुधवार ला ८ ते१० पर्यंत राष्ट्रीय कीर्तनकार व खंजेरी वादक कुमारी क्रांती काळे सत्यपाल महाराज यांची शिष्य राहणार साखरी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांचे कीर्तन दिनांक ७ ला गुरुवार पहाटे ३ ते ६ शोभायात्रा सकाळी १०ते १ गोपाल काल्याचे किर्तन ह भ प श्री गजानन महाराज कपिले व संच हिंगणघाट व सात संगत वारकरी
भजन मंडळी पळसगाव व भोसा दुपारी १ ते ४ शोभायात्रा ४ वाजता दहीहंडी व महाप्रसाद चे आयोजन केलेले असते, श्री संत सुख आईचे हजारो भाविक या निमित्ताने गावाला भेट देत असून श्रीचे सरणी नतमस्तक होऊन उत्सव साजरा होत असतो,
दिवाळीच्या कार्यकाळात यात्रा असल्याने दरवर्षी सुट्ट्या असल्यामुळे दुरून दुरून भाविक येत असतात, भाविकांना सर्व सुविधा देवस्थानच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात.
Hingnghat:देवस्थान अध्यक्ष श्री सुरेश लेंडे यांनी पुण्यतिथी महोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.