प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आयोजित हिरकणी बिझनेस अवॉर्ड्स आणि ब्यूटी एक्स्पो मोठया उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कनक यूनिक ब्यूटी पार्लरच्या व्यावस्थापक मीना सोनटक्के यांनी केले, तर ब्यूटी डे टू डेस प्रदीप मारोटकर यांनी याचे संचलन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे* उपस्थित होत्या.ज्यांनी आपल्या साधेपणा आणि व्यक्तिमत्त्वाने सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.स्वाती अतुल वांदिले, मीना सोनटक्के ,प्रदीप मारोटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या एक्स्पोमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
या कार्यक्रमात आशू ग्लॅम मेकर, शेल्बी मेकअप आर्टिस्ट, अंजली भांदक्कर, रुतुजा मेकअप स्टुडिओने आपल्या सत्रांमध्ये ब्युटी आणि मेकअपशी संबंधित नव्या तंत्रज्ञान आणि ट्रेंड्सवर चर्चा केली आणि उपस्थित व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात बॅकस्टेज मेकअप, मेहंदी आणि हेअरकट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,
यामध्ये ६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग आपली कला सादर केली आणि परीक्षकांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. त्यानंतर “मी अँड मॉम” फॅशन शो आणि मॉडेल हंटने प्रेक्षकांची मने जिंकली, ज्यात आई-मुलींच्या जोड्यांनी फॅशनसोबत आपली कला आणि कौशल्य सादर केली. या स्पर्धेने कार्यक्रमात एक वेगळा रंग भरला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, ज्यामध्ये सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी सर्व स्पर्धक आणि आयोजकांचे कौतुक केले आणि असे कार्यक्रम स्थानिक प्रतिभांना एक व्यासपीठ देऊन महिलांच्या सक्षमीकरणात महत्त्वाचे योगदान देतात, असे मत व्यक्त केले.
Hingnghat:कार्यक्रम यशस्वीतेसाठी रितेश सोनटक्के, प्रीतम गुप्ता, कनक सोनटक्के, एंजल सोनटक्के, राहुल डेविड, लीना शेंडे, चांद जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.हिंगणघाटमधील या ब्यूटी एक्स्पो आणि सेमिनारने नवी दिशा दिली असून, आयोजकांनी या यशस्वी कार्यक्रमानंतर भविष्यात आणखी मोठे इव्हेंट्स आयोजित करण्याची घोषणा केली आहे.