प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट :-स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शसंत नगाजी महाराज यांचे नाव शासनाचे वतीने नुकतेच बहाल करण्यात आले. संत नगाजी महाराज तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील मोठे दैवत आहे.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे विशेष प्रयत्नाने शासनाने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस नाव दिल्यामुळे अनेक संस्था संघटनांचेवतीने आ. समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.
आज दि. १४ ऑक्टोबर रोजी संत नगाजी महाराज संस्थान,पारडी (नगाजी)येथील सर्व विश्वस्तांनी आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे कपिक करा
Hingnghat:याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र मांडवकर, सचिव रामभाऊ भोयर, उपाध्यक्ष प्रफुल बाडे, विश्वस्त सारंग दौड, डॉ.अतुल घोरपडे, राजेंद्र ठाकरे, शरद भोयर, संजय इंगोले, श्याम भीमनवार, धनराज चिडे, मनोज चिडे, घनश्याम खुनकर,गजेंद्र पवार,यश भोयर इत्यादी विश्वस्तांनी आ.समीर कुणावार यांचे आभार मानले.