कोरा येथे आमदार समिर कुणावार यांचा करण्यात आला भव्य नागरी सत्कार(Hingnghat )

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :समुद्रपुर: कोरा या ठिकाणी समीर कुणावार यांचा सत्कार प्रसंगी सांगितले पहिल्यांदा मी आमदारकीसाठी उमेदवारी केली त्यावेळी थोड्या मताने माझा पराभव झाला मी त्यावेळी सुद्धा मतदांराचे आभार मानले त्यांनतर थांबलो नाही सत्तत ५ वर्ष जनतेच्या संपर्कात राहिलो आणि जनतेने मला दोन वेळा भरभरून मते देऊन विधानसभेत पाठविले मी कधीही स्वताला आमदार समजलो नाही कारण मला जनतेने आपला सेवक म्हणून विधानसभेत सेवा करण्यासाठी योग्य समजून पाठविले आणि मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मी रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी स्वताला झोकून घेतले तुमचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.

आणि तुमच्या मुळेच वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बहुमान प्राप्त झाला असून तो माझा नाही तर मतदार संघातील जनतेचा आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

काहि राजकीय लोकांना विधानसभा क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय आल्याने पोटदुखी होत आहे त्यामुळे च ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विरोध करीत जनतेची दिशाभूल करीत आहे.

तालुक्यातील कोरा सर्कलच्या वतीने आमदार समिर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल काल दिनांक ०८-१०-२०२४ ला भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोरा गावा बाहेरील रहिमान फाट्यावरून भव्य रॅली काढून आमदार कुणावार यांच्या अनेक गावातील नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक लहानुजी जोगवे,हभप शांताराम महाराज जामुनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले, राम पंढरे,संजय डेहणे, वामन चंदनखेडे, मोहन बाकरे, ईश्वर लोखंडे, रवि लढी, पुरुषोत्तम कोल्हे, गुलाब चिंचोलकर,केशव डंभारे, नामदेव चौके,रोशन चौके, किशोर नेवल,गजानन राऊत, पुष्पांजली नेवल,विजया तेलरांधे, नरेंद्र फोपडे, वसंत घुमडे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की महाराष्ट्र ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये कसे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात यशस्वी ठरलो आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझ्ये धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे.

Hingnghat :नवरात्र सुरू असताना कोरा परिसरातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार आहे व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याचे कामे हाती घेणार आहो असे मत त्यांनी व्यक्त केली यावेळी किशोर दिघे,रोशन चौके यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला येशस्वी करण्यासाठी मनोज बारस्कर, रोशन चौके,शुभम भगत,हेमंत राउत,बाबा कोसूरकर, राजेंद्र कावडे, नामदेव तपासे,गौरव नखाते आदिंसह गावातील नागरिकांना सहकार्य केले.

Leave a Comment