प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat :हिंगणघाट :- 2 ऑक्टोबर….
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ हिंगणघाट तालुकास्तरीय व्हिडीओ निर्मिती
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)
स्पर्धेत एस.एस.एम.विद्यालय,हिंगणघाट चे उपक्रमशील शिक्षक सतीश गौळकार यांच्या वर्ग 6 ते 8 च्या गटात गणित,सामान्य विज्ञान,सामाजिक शास्त्र या तीन विषयाच्या दर्जेदार व्हिडीओ निर्मितीला प्रथम क्रमांक तर इंग्रजी
विषयाच्या दर्जेदार व्हिडीओ निर्मितीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.तसेच भाषा विषयात तृतीय क्रमांक प्राप्त झाला .विशेष म्हणजे सर्व पाचही गटात क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच वर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेत भाषा व इंग्रजी या विषयाच्या व्हिडिओ निर्मितीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत सतीश गौळकार यांचे सुयश(Hingnghat)
Hingnghat :विजयी शिक्षकाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संस्थेचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक खडतकर सर उपमुख्याध्यापक मद्दलवार मॅडम , पर्यवेक्षक चंदनखेडे सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.