प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
Hingnghat:सिंदी रेल्वे ता.१ : शहरात पंचविस वर्षाअगोदर लावलेल्या “एकता” नावाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असुन ‘सेवाभवनाच्या’ रुपाने लागलेल्या पहिले फळाचे लोकार्पण सोमवारी (ता.३०) ला कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडले.
सोबतच लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांना नुकताच मिळालेल्या उत्कृष्ट संसदपटु सन्मानाबदल मंडळाच्यावतीने त्यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कलोडे होते.कार्यक्रमाला किशोर दिघे, डॉ संदीप वर्मा, गंगाधर कलोडे,राजु गंधारे,एकताचे अध्यक्ष राजु तेलरांधे,संघटक नरेश पेटकर, स्नेहल कलोडे,ओम राठी,अमोल सोनटक्के धीरज लेंडे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम बसस्थानक चौकात एकता युवा मंडळाच्यावतीने आमदार कुणावार यांचे भव्य स्वागत करुन फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली व बाईक रॅली व्दारे पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी म्हणजे रेल्वे उड्डाणपूलाजवळील चौहान लेआऊट येथे नेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाचे पूजन करुन करण्यात आली याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मोहनभाऊ पालीवाल व सदस्य पंकज देवस्थळे याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर आमदारांच्या हस्ते सेवा भवनाच्या मुख्य हाॅलेचे फीत कापुन लोकार्पण करण्यात आले.मा.आमदार यांना उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाल्याबद्दल मंडळाच्यावतीने सर्व सभासदांनी ह्सरदयस्पर्शी सत्कार केला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संघटक नरेंद्र पेटकर यांनी केले त्यांच्या प्रास्ताविकातून त्यांनी संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला व मंडळाच्या माध्यमातून कशाप्रकारे समाजसेवा केली जाते हेही सविस्तर सांगितले.
सत्काराला उत्तर देतांनी आमदारानी मंडळाच्या कार्याची स्तुती करीत आज समाजाला सेवाभाव कार्य करणाऱ्यांची नितांत गरज असुन मंडळाने रक्त आणि नेत्र दानासारख्या कार्यात पुढाकार घेऊन नविन आदर्श निर्माण करावा.यासाठी आमदार म्हणुन नाही तर एक समाजातील माणुस म्हणुन मी तन मन धनाने आपल्या सोबत असल्याचे सांगत आश्वस्त केले.
Hingnghat:त्यानंतर मंडळाचे दिवंगत अध्यक्ष मोहनभाऊ पालीवाल यांच्या पत्नी श्रीमती नेहाजी पालीवाल याचाही मंडळाच्या वतीने माननीय आमदार श्री समीरभाऊ कुणावर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र ढोबळे यांनी केले व आभार प्रदर्शन दामोधर कोपरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री राजुभाऊ तेलरांधे उपाध्यक्ष नरेंद्र पटेल, कोषाध्यक्ष मंगेश मुंधडा, पदाधिकारी जमिल खान,वसंता सिर्से, पुरुषोत्तम व्यास, रमाकांत बोकडे सुभाष तळवेकर नरेंद्र कठाणे,शकिल शेख,अमोल पालीवाल , डॉक्टर विश्वास, महेश राऊत,भूपेश देवतळे, ज्ञानेश्वर ठाकरे,राजु गिरडे,संजय मुडे,कवडू म्हैसकर,संदिप दुम्पलवार ,प्रणय चावरे,रवी मुंदडा,जनक पालीवाल,देवा पडवे गुड्डू पालीवाल,हेमंत सोनटक्के,ललित बेताला बालु सोनटक्के, राजेंद्र कोसुरकर, प्रशांत कामडी,विनेश पालीवाल,सुरेश ठाकरे , रविंद्र सागरकर ,बंडू पडवे, मोहसीन खान,शाबीर पठाण,जिलानी सुर्या,प्रविण जुमडे,गजु ढेकन, मुकेश डोळसकर, पिंटू टेंभरे,अजिम शाहा, शालीक उरकुडे,सचीन मोरस्कर, तुषार ठोंबरे,रोषन तडस,सुनील रेवतकर , रविंद्र साखरकर ,सचिन यादव, सतीश ढोक, रुपेश सारवान,संजय ढोक , सुरेश पादाडे, गणेश मोरस्कर आदींनी परिश्रम घेतले