प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट :- पंचायत समिती हिंगणघाटच्या नवं निर्मित होणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण -: आमदार समीर कुणावार यांचे प्रतिपादन_
आज हिंगणघाट येथे पंचायत समितीच्या आवारामध्ये पंचायत समिती हिंगणघाट प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १४ कोटी ९९ लक्ष रूपयांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व सुरेश वाघमारे माजी खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी सर्व मान्यवर सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना पुजेचा मान देण्यात आला.
अविस्मरणीय क्षणांचे मानकरी होण्याचा मान मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच हिंगणघाट तालुक्यातील सर्व मान्यवर सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार आमदार कुणावार यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी माझ्या दहा वर्षातील कारकिर्दीतील आज दिवस माझ्यासाठी अत्यंत बहुमोलाचां असून अविस्मरणीय आहे पंचायत समिती हिंगणघाटला नवीन प्रशासकीय इमारत शासनाकडून मंजूर करून घेण्याचा माझा सातत्याने प्रयत्न होता.
अखेर त्या प्रयत्नांना यश येत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व्दय, ग्राम विकास मंत्री आणि राज्य शासनाचे यावेळी त्यांनी आभार मानले आणि संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांना तातडीने काम सुरू करण्याचा सुचना देत उत्तम दर्जाचे काम करण्याचे निर्देश दिलेत. याप्रसंगी रहमान साहेब, मुख्य
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, सुरेश वाघमारे माजी खासदार, गंगाधरराव कोल्हे माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, शारदा आंबटकर, माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, प्रफुल्ल बाडे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट, आकाश पोहाणे, डॉ पर्बत,
Hingnghat :अंजने गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, खैरे उपविभागीय अभियंता लघू पाटबंधारे विभाग, घनश्याम येरलेकर, ज्योत्स्ना सरोदे माजी जिल्हा परिषद सदस्य, वैशाली पुरके, वंदना मडावी, लता घवघवे, इंदिरा उरकुडकर, सुनंदा सांयकर, बेहेकर सहाय्यक गटविकास अधिकारी हिंगणघाट, गुडंतवार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग वर्धा, अमोल चिरुटकर, सचिन सावरकर, नितीन सुकळकर आदी मान्यवर उपस्थित होते