highcourt:बुलढाणा:दारु पिवून आला असल्याने कामावर न घेण्याचे वादातून कंपनीतील सफाई कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना २०२२ रोजी घडली होती. आज सोमवार २९ एप्रिलला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल सी. खटी यांनी निकाल दिला.
यामध्ये प्रकरणातील दोन्ही खूनी आरोपींना जन्मठेपेची व प्रत्येकी ५०० रू.दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद हुसेन मोहम्मद असे मृतक सफाई कामगाराचे नाव आहे.
मुकादम हसमुख उर्फ मोहम्मद इमदादुल लष्कर (३२ वर्ष) तसेच सुपरवाइझर मुन्नाभाई उर्फ मुजमिल शेख आबिद हुसेन असे दोघा खुनी आरोपींची नावे आहेत.
चिखली तालुक्यातील बेराळा येथे ‘जस्ट फूड कंपनी’ आहे. यामध्ये कामगार लोकांसाठी भोजन तयार करण्यात येते व डब्यांद्वारे पुरविण्यात येते. या कंपनीमध्ये मोहम्मद हुसेन मोहम्मद हा सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बोन्हा बिरभुम, (पश्चिम बंगाल ) येथील रहिवासी होता.
मात्र २ जून २०२२ पासून तो बेराळा येथील कंपनीत कामाला होता. दरम्यान १५ ऑगस्ट २०२२ रोजी तो रात्री नऊ वाजता दारू पिऊन आला. गेट समोर आल्यानंतर, दारू पिऊन आल्याने तेथील वॉचमनने ही बाब मुकादम हसमुख आणि सुपरवायझर मुन्नाभाई याला सांगितले व मोहम्मद हुसेन याला कंपनीच्या आत घ्यायचे की नाही ? अशी विचारणा केली. त्यावेळी त्याला कामावर घेण्यास नकार देण्यात आला.
त्यांनतर मृतक मोहम्मद याची मुन्नाभाई याच्याशी बोलचाल झाली होती. रात्री ९ते १० वाजेच्या दरम्यान मृतक मो. हुसेन याने वॉचमनची नजर चुकवून कंपनीच्या किचन हॉलमध्ये गेला असता त्याचे मागोमाग आरोपी हसमुख हा देखील त्याठिकाणी गेला. त्यावेळी त्यांचेमध्ये परत कामावर न घेण्याच्या कारणावरून वाद झाला व हसमुख याने मृतक मोहम्मद हुसेन यास सिमेंटच्या पाय-यावरून भांडे धुण्याच्या मशिनपर्यंत ओढत नेवून फावडयाने त्याचे डोक्यात वार केले. त्यांनतर परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्टला सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान दोन्हीही आरोपींनी पुन्हा याच कारणावरून कंपनीच्या गेटसमोर मृतक मो. हुसेन यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांनी’ हल्ला केला अन नाचणारे वऱ्हाडी सैरावैरा पळाले ; बुलढाण्यातील थरारक घटना ( buldhananews )
व त्याचे दोन्ही पाय धरून ओढले व हसमुखने स्टीलचे रॉडने त्याचे डोक्यात वार करून दोघांनीही मोहम्मदला जिवानिशी ठार मारले. सदर गुन्हाची फिर्याद कंपनीचे वॉचमन सुखदेव नरसिंग साळोख यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी चिखली पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्याआधारे दोन्ही आरोपींविरूध्द खुनाचा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासा दरम्यान सगळ्या गोष्टींची पुर्तता झाल्यानंतर संबंधीत तपास अधिकारी यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.
सदरचा खटला चालविण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा स्वप्नील खटी यांचे न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे एकुण आठ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वॉचमन सुखदेव नरसिंग साळोख, वॉचमन दिपक लालसिंग पवार, पंच शेख अज शेख रशिद पटेल, सुनिल प्रकाश पाटील, कामगार सिताराम ललीतरॉय, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रूग्णालय चिखली डॉ. अमोल प्रतापसिंग राजपूत व तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्या साक्षी अतिशय महत्वपूर्ण, एकमेकांना पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्याकारणाने विश्वासार्ह ठरल्या.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाय मृतकाच्या संपूर्ण अंगावर आढळून आलेल्या जखमेच्या अनुषंगाने व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे वैद्यकिय अधिकारी यांची साक्षदेखील अतिशय महत्वपूर्ण ठरली व या सगळ्या पुराव्याचे आधारे विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा श्री. स्वप्नील चंद्रकांत खटी यांनी दोन्हीही आरोपींना भांदविचे कलम ३०२ , ३४ अन्वये दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी ५०० रू दंड अक्षी शिक्षा सुनावली आहे.
highcourt:सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे सांगड घालून सरकार पक्षाची बाजु भक्कमपणे वि. न्यायालयासमोर मांडली. तर पो.हे.कॉ. नंदाराम इंगळे, पो.स्टे. चिखली यांनी कोर्ट पैरवी म्हणून पुर्णपणे सहकार्य केले.