Google Internship:अमेरिकेतील कॉम्प्युटर सायन्सच्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी गुगलने समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची जाहीरात केली आहे.
ही इंटर्नशिप १२ ते १४ आठवड्यांची असून, विद्यार्थ्यांना गुगलच्या ग्लोबल टीमसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे, मात्र गरजेपेक्षा जास्त अर्ज आल्यास ही भरती तारखेच्या आधीही बंद केली जाऊ शकते.
इंटर्नशिपसाठी अर्ज कसा करावा?
कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करणारे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. मजबूत प्रोगॅमिंग स्किल्स, विशेषतः Python, Java, C++ या भाषांमध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी गुगलच्या अधिकृत करिअर पेजवर जाऊन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न PhD समर २०२५ टॅबवर क्लिक करावे लागेल.
तिथे अपडेटेड Resume इंग्रजीत अपलोड करावा लागेल, तसेच अनऑफिशियल किंवा ऑफिशियल ट्रान्सक्रिप्टही अपलोड करावी.
इंटर्नशिपचे फायदे
गुगल इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळते. भविष्यात गुगल किंवा इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ जॉब मिळण्याची शक्यता वाढते.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Google Internship:या इंटर्नशिपमध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार असल्याने ही संधी खूप फायदेशीर आहे